राहुल-विजयचा इन्स्टावरील व्हिडीओ ब्लॉक, लोकप्रियता लॉक करण्याचा कट?

Rahul Gandhi Vijay Video Blocked Instagram Controversy: विजय थलापतीच्या एका व्हिडीओनं देशाच्या राजकारणात मोठा भूकंप घडवलाय. असं काय होतं त्या व्हिडीओमध्ये की तो व्हीडीओ ब्लॉक करावा लागला.. नेमकं प्रकरण काय? पाहा हा रिपोर्ट...
Rahul Gandhi and Vijay Thalapathy’s viral Instagram video sparks controversy after sudden block
Rahul Gandhi and Vijay Thalapathy’s viral Instagram video sparks controversy after sudden blockSaam TV
Published On

राहुल गांधी आणि विजय थलपती... एक तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि एक देशाचे विरोधी पक्षनेते. त्यांचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर येतो आणि अवघ्या एका तासात १२ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार करतो....त्यानंतर तब्बल ४६ मिलियन लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचतो. मात्र अचानक इन्स्टाग्रामने तो व्हिडीओ ब्लॉक केला. काही तासांसाठी हा व्हिडिओ गायब झाल्याने सोशल मीडियासहीत देशाच्या राजकारणात एकच खळबळ माजली. असं या व्हिडीओमध्ये काय होतं तर तो व्हिडीओ तुम्ही पण पाहा,

इतका स्वच्छ साधा व्हिडीओ ज्यात कुठलीही टिका नाही कुठलाही संवाद नाही तर फक्त विजय थलापतींच्या चाहत्यांचा आनंद आणि राहुल गांधींनी पाठिंबा दिल्यामुळे विजय यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव दिसतायेत. राहुल गांधींनी २२ वर्षांची डीएमके सोबतची युती तोडून TVKला पाठिंबा दिला. असं असतांना कुठलाही कॉपीराईट नसतांना हा व्हिडीओ अचानक काही वेळातच ब्लॉक झाल्यानं आश्चर्य व्यक्त होऊ लागलं. ४६ मिलियन लोकांपर्यंत पोहचलेला असतांना अचानक दिसेनासा झाला.

विजय थलपतींच्या शपशविधीतील व्हिडीओ

विजय यांचा लोकांसोबत सेल्फी व्हिडिओ

व्हिडीओत राहुल गांधींचा सत्कार आणि सेल्फी

व्हिडीओत कुठलाही संवाद नाही

मात्र हा व्हिडिओ ब्लॉक केल्यानंतर हे प्रकरण चांगलंच पेटलं. याची दखल घेत राहुल गांधींच्या पोस्टवर कोणतीही बंदी घातलेली नसल्याचं आयटी मंत्रालयानं स्पष्ट केलं. हा सर्व प्रकार इन्स्टाग्रामच्या सिस्टीममधील चुकीमुळे झाला असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर ही पोस्ट पुन्हा इन्स्टाग्रामवर दिसू लागली. मात्र हा व्हिडीओ जाणिवपूर्वक ब्लॉक केल्याचा आरोप करण्यात आला.

विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या रिल्सला एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळत असताना रिल गायब होणं हे केवळ तांत्रिक कारण असू शकतं का? तांत्रिक चुकीच्या नावाखाली एखाद्या पोस्टचा रीच कमी करण्याचा हा प्रकार तर नाही ना? अशी चर्चा आता रंगलीये. आता हा रिल अनब्लॉक केला असला तरी यामुळे जो राजकीय वाद आणि सोशल मिडीयाच्या विश्वासार्हतेवर उपस्थित झालेला सवाल मात्र अजूनही कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com