Rahul Gandhi: राहुल गांधींचा बिलासपूर ते रायपूर ट्रेनमधून प्रवास; स्लीपर कोचमध्ये प्रवाशांच्या समस्या घेतल्या जाणून, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi Video: छत्तीसगड दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी बिलासपूर ते रायपूरपर्यंत ट्रेनने प्रवास केला. या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत
Rahul Gandhi Video
Rahul Gandhi VideoSaam tv
Published On: 

Rahul Gandhi Train Journey:

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बिलासपूर ते रायपूरपर्यंत ट्रेनने प्रवास केला. या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या प्रवासादरम्यान त्यांनी सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. छत्तीसगडमध्ये या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. (Latest Marathi News)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'च्या काँग्रेस हँडलवरून राहुल गांधींचा हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टवर राहुल गांधी बिलासपूर ते रायपूर असा प्रवास करत असल्याचा उल्लेख आहे. तसेच या हँडलवर राहुल गांधी यांना 'जननायक' अशी उपमा दिली आहे.

Rahul Gandhi Video
Vaidyanath Sugar Factory: 'पंकजा मुंडेंनी योग्य भूमिका घ्यावी'; कारखान्यावरील कारवाईनंतर देशमुखांचा सल्ला की ऑफर?

'एएनआय' या वृत्तसंस्थेने राहुल गांधी यांच्या प्रवासाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'राहुल गांधी ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये प्रवाशांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळी अनेक लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

'पीटीआय'च्या वृत्तानुसार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज सोमवारी बिलासपूर जिल्ह्यात राज्य सरकारच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या सभेत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर राहुल गांधी हे बिलासपूर रेल्वे स्थानकात पोहोचले. त्यानंतर रायपूरला जाण्यासाठी इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास केला.

राहुल गांधी यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस प्रदेश प्रभारी कुमारी शैलजा आणि इतर काही नेते देखील आहेत. ही इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेन रायपूरला ५:४५ पोहोचली. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाच छत्तीसगडहून जाणाऱ्या काही ट्रेन रद्द केल्यानंतर काँग्रेसने आंदोलन केलं होतं.

Rahul Gandhi Video
AIADMK ends alliance with BJP: तामिळनाडूत भाजपला मोठा धक्का; AIADMK पक्षाने केली NDAमधून बाहेर पडण्याची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com