तामिळनाडूत भाजपला मोठा धक्का बसला आहे. ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कषगम (AIADMK) पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. AIADMK ने पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)
ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कषगम पक्षाचे नेते के. पी. मुनुसामी यांनी या निर्णयाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कषगम पक्ष आजपासून भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतचं संबंध तोडत आहे'.
'राज्यातील भाजपचं नेतृत्व गेल्या एक वर्षांपासून आमचे नेते, पक्षाचे महासचिव आणि कार्यकर्त्यांवर अनावश्यक टिप्पणी करत आहेत. यामुळे पक्षाच्या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती देखील ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कषगम पक्षाने दिली.
दरम्यान, बिहारमध्ये नितीशकुमार, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि पंजाबमध्ये अकाली दलाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णयानंतर (ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कषगम) AIADMK हा चौथा मोठा पक्ष आहे. जो राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला आहे. (Latest Political News)
पीटीआयच्या वृत्तानुसार, ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कषगम पक्ष आगामी २०२४ च्या निवडणुकीत एका वेगळ्या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. दरम्यान, देशात दोन प्रमुख आघाड्या आहेत. एक भाजप नेतृत्व करणारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि दुसरी विरोधकांची 'इंडिया' आघाडी.
याचदरम्यान, देशातील काही राजकीय पक्ष दोन्ही राजकीय आघाड्यांमध्ये सहभागी झालेले नाहीत. त्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती, खासदार असद्दुीन ओवैसी यांची ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन , ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बीजू जनता दल आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाईएस जगन मोहन रेड्डी यांची 'वाईएसआर काँग्रेसचा सामावेश आहे.