Brij Bhushan Sharan Singh: बृजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ; ठोस पुरावे असल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा, कोर्टात नेमकं काय घडलं?

Brij Bhushan Sharan Singh: बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात ठोस पुरावे असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी कोर्टात सुनावणीदरम्यान केला आहे.
Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singhsaam tv

Delhi Police on Brij Bhushan Sharan Singh:

कथित महिला खेळाडूंचं लैंगिक शोषणप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात ठोस पुरावे असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी कोर्टात सुनावणीदरम्यान केला आहे.

'बृजभूषण शरण सिंह यांनी महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण करण्याची एकही संधी सोडली नाही, असा आरोप देखील दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कोर्टात सुनावणीदरम्यान केला आहे. (Latest Marathi News)

दिल्ली पोलिसांनी कोर्टात काय म्हटलं?

दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी ताजिकिस्तान येथील घटनांचा आधार घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.ताजिकिस्तान येथील एका कार्यक्रमादरम्यान बृजभूषण शरण सिंह यांनी बळजबरीने एका महिला खेळाडूची गळाभेट घेतली असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला. दिल्ली पोलिसांच्या आरोपानंतर वडिलकीच्या नात्याने गळाभेट घेतल्याचे त्यांनी कोर्टात सांगितलं.

Brij Bhushan Sharan Singh
Delhi Crime: तीनशे रुपयांसाठी पान टपरी मालकाची हत्या; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

एका महिला खेळाडूच्या आरोपानुसार, बृजभूषण शरण सिंह यांनी महिला खेळाडूच्या परवानगी विना तिच्या अंगातील शर्ट वर करून पोटाला हात लावला. दिल्ली पोलिसांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, या सर्व घटना भारताबाहेर घडल्या आहेत. परंतु या प्रकरणाशी संबंधित आहेत.

पुढील सुनावणी कधी?

पोलिसांनी कोर्टात काही बाबी अधोरेखित करताना म्हटल्या की, 'पीडित महिला खेळाडूंनी या घटनांवर उघड भाष्य केलं किंवा करण्यास नकार दिला हे महत्वाचं नाही. परंतु त्यांच्यासोबत चुकीचं झालं आहे. तसेच यावेळी दिल्लीतील डब्ल्यूएफआय कार्यालयातील एका कथित घटनेचाही उल्लेख करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

'बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी सरकारने देखरेख समिती स्थापन केली आहे. परंतु त्यांना दोषमुक्त करण्यात आलेलं नसल्याचंही दिल्ली पोलिसांनी मागील सुनावणीत सांगितलं होतं.

Brij Bhushan Sharan Singh
Mann ki Baat: चांद्रयान-3 आणि जी-20 च्या यशाचा देशवासियांना आनंद... 'मन की बात' मधून PM मोदींचा जनतेशी संवाद

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com