Delhi Crime: तीनशे रुपयांसाठी पान टपरी मालकाची हत्या; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

Delhi Crime News: पैशाच्या वादातून एका ४३ वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना दिल्लीमध्ये घडलीय.
Delhi Crime
Delhi Crimesaam Tv

Delhi Crime News:

पैशाच्या वादातून एका ४३ वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना दिल्लीमध्ये घडलीय. अजय कुमार, असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणात दिल्ली शहर पोलिसांनी शनिवारी २ आरोपींना अटक केलीय. (Latest Crime News)

या हत्येप्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी मुखमेलपूर पुलिया भागातील नाल्यात एक मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. या घटनेची माहिती सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आली. आरोपींच्या शोधासाठी गस्त वाढवण्यात आलीय. सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करत आरोपींचा शोध घेतला जाऊ लागला.

या हत्येच्या तपासात पोलिसांनी शहरातील सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. या पोलिसांना दोन संशयित व्यक्ती दिसल्या. या दोघांचा या हत्याकांडात हात असल्याचं पोलिसांना संशय आला. या दोघांचा शोध घेत त्यांना अटक केली. मोहम्मद इर्शाद (२९) आणि दिनेश कुमार (३८), असे या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही बिहारचे रहिवाशी आहेत. त्यानंतर आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त रवी कुमार सिंग यांनी दिली.

या दोघांची चौकशी केल्यानंतर इर्शादने गुन्हा कबूल केला. त्याने दिलेल्या जबाबानुसार, मृत अजय कुमारचं नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पान टपरी होती. ही टपरी त्याने आरोपींना भाड्याने चालवण्यास दिली होती. अजय आरोपींकडून दररोज ३०० रुपये भाडे घेत होता. अजय कुमार आरोपींकडून दररोज भाड्याची मागणी करत असायचा. याच कारणावरून त्यांच्यात वादही होत होते. या गोष्टीचा राग आरोपी इर्शादच्या मनात होता.

त्याने ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री अजय मद्यधुंद अवस्थेत असताना त्याला ऑटो-रिक्षात ओढले आणि त्याची हत्या केली. हत्येचा कोणालाही सुगावा लागू नये, यासाठी नवी दिल्लीतील मुखमेलपूर पुलिया भागातील नाल्यात अजयचा मृतदेह टाकून दिला, असं डीसीपीने सांगितले.

Delhi Crime
Satara Crime: प्रियकराशी लग्न करण्यासाठी नवऱ्याला संपवलं; हत्या केल्यानंतर कालव्यात फेकलं

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com