तारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. शहरातील शिवाजीनगरमधील बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे समोर आलंय. अजित बुरुंगले (वय 24) असे या तरुणाचे नाव आहे. पत्नीच्या प्रेमप्रकरणामुळे अजित बुरुंगले याची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीने प्रिकराच्या मदतीने अजितचा खून केला. दरम्यान अजित रविवारीपासून बेपत्ता होता. त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल होती. (Latest Crime News)
गणेश चतुर्थीच्या दिवशी विडणी (ता. फलटण) नीरा उजव्या कालव्यात हातपाय बांधलेल्या अवस्थेत अजितचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करता अजितची पत्नी आणि तिचा प्रियकराला अटक केलीय.
दरम्यान पोलिासांनी संशयित अजितची पत्नी आणि तिचा प्रियकर करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड, केसनंद, पुणे) या पोलिसांची या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली या दोघांना राहुल उत्तम इंगोले (वय २२ रा. वाघोली, पुणे) याने मदत केली होती पोलीस त्याच्या शोधात आहेत.
दरम्यान अजितच्या घरच्यांनी अजित बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल केली होती. पोलिसांनी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार तपास सुरू केला. गणेश चतुर्थीला पोलिसांना नीरा उजव्या कालव्यात एका तरूणाचा मृतदेह आढळला होता. पुरवे मिटवण्यासाठी या मृतदेहाचे हातपाय बांधले होते. पोलिसांकडे आलेल्या मिसिंगच्या तक्रारीच्या आधारे हा मृतदेह अजितचा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत पत्नीची कसून चौकशी केली. चौकशीत पत्नीचे करणशी प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. त्यामुळे प्रेमसंबंधात आणि लग्न करण्यात नवरा अडथळा वाटू लागला होता. करणने त्याचा साथीदार राहुलसह अजितला फलटणला बोलावून घेतले. यानंतर अजितचा गळा आवळून खून करण्यात आला. करणने अजितला घरातून बोलवून त्यानंतर त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी नीरा उजवा कालव्यामध्ये मृतदेह टाकून दिल्याची कबूली करणने दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.