Buldhana Ganpati Utsav : शांतता क्षेत्रात फटाके वाजवून जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे एका गणेश मंडळाच्या २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान या कारवाईनंतर मलकापूर शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी (police inspector ashok ratnaparkhi) यांची पोलीस मुख्यालयात बदलीची झाल्याची दबक्या आवाजात शहरात चर्चा सुरु आहे. (Maharashtra News)
मलकापूर शहरातील चाळीस बिघा परिसरात अनेक रुग्णालये आहेत. या परिसरातून गणेश मंडळांची मिरवणूक जात असताना फटाके वाजवून परिसरात रुग्णांना त्रास होईल असे वर्तन गणेश मंडळाने केल्याची तक्रार एका डॉक्टराने पाेलीसांत केली.
या तक्रारीवरून मलकापूर शहरातील एका गणेश मंडळावर शांतता क्षेत्रात फटाके वाजवून शांतता भंग केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याचे गुन्हे मंडळाच्या २५ सदस्यांवर दाखल केले.
दरम्यान या कारवाईनंतर मलकापूर शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्यावर कारवाई झाल्याची चर्चा आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांनी केल्याची चर्चा दबक्या आवाजात असून रत्नापारखी यांची पोलीस मुख्यालयात बदली झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.