Vaidyanath Sugar Factory: 'पंकजा मुंडेंनी योग्य भूमिका घ्यावी'; कारखान्यावरील कारवाईनंतर देशमुखांचा सल्ला की ऑफर?

Anil Deshmukh: 'पंकजा मुंडेंवर पक्ष अन्याय करतोय, त्यांनी योग्य भूमिका घ्या, असं आवाहन अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडे यांना केलं आहे.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSaam tv

Anil Deshmukh On Pankaja Munde

मनोज जयस्वाल, वाशिम

पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर कारवाई करण्यात आली. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारवाई करत कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाच्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.

'पंकजा मुंडेंवर पक्ष अन्याय करतोय, त्यांनी योग्य भूमिका घ्या, असं आवाहन अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडे यांना केलं आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख सध्या वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, वाशिम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावरील कारवाईवर भाष्य केलं.

Anil Deshmukh
AIADMK ends alliance with BJP: तामिळनाडूत भाजपला मोठा धक्का; AIADMK पक्षाने केली NDAमधून बाहेर पडण्याची घोषणा

'पंकजा मुंडे यांच्यावर त्यांचाच पक्ष अन्याय करतोय. त्यांनी याबाबत विचार करायला हवा. त्यांनी योग्य भूमिका घ्यावी, असं आवाहन अनिल देशमुख यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अनिल देशमुख पुढे म्हणाले, 'महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला वाढवण्याचे काम गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं. आज दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, त्यांच्याच मुलीवर पक्षाकडून अन्याय होत असल्याची बाब दिसून येत आहे. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की, ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय होत आहे, त्यांनी त्याचा विचार करून योग्य ती भूमिका घ्यावी'.

काय आहे प्रकरण?

पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्याआधी धाड टाकली होती. त्यावेळी त्यांनी काही कागदपत्रे तपासले होते.

यामध्ये या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आहेत.

Anil Deshmukh
MLA Disqualification Case : 'आम्हाला शेड्यूल १० लागू होत नाही', आमदार अपात्रतेच्या सुनावणीतील 10 महत्वाचे मुद्दे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com