मला फरफटत नेलं, त्यातील दोन पोलीस कानात सांगत होते, हे सरकार..; राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट, एकच खळबळ

Rahul Gandhi Police Dragged Big Revelation Neet Protest: दिल्लीतील NEET पेपरफुटी आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांना पोलिसांनी फरफटत नेल्याचा आरोप. दोन पोलिसांनी सरकार हटवण्याची सूचना केल्याचा मोठा दावा. पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका.
Rahul Gandhi speaks to media after being detained during NEET protest in Delhi, alleging police coercion and political pressure.
Rahul Gandhi speaks to media after being detained during NEET protest in Delhi, alleging police coercion and political pressure.saam tv
Published On

मागच्या काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्यांवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा याच मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. तसेच सोमवारी तरुणांनी संसदेवर मोर्चा काढला. मात्र यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे राहुल गांधी या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आणि सर्व खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर ठिय्या मांडला. यावेळी पोलीस आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक वाद आणि झटापट झाली. दोनतासांच्या हायव्होलटेज घडामोडीनंतर राहुल गांधी यांना पोलिसांनी फटफटत पोलीस व्हॅनमध्ये टाकले. त्यावेळी त्यांच्या नाकातून रक्त देखील आले होते. त्यानंतर रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले.

Rahul Gandhi speaks to media after being detained during NEET protest in Delhi, alleging police coercion and political pressure.
Rahul Gandhi: पंतप्रधानांचा माफीनामा ते प्रधानांचा राजीनामा...राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे

यानंतर या सगळ्या प्रकरणावर आज (22 जुलै) राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पोलिसांनी तुम्हाला फरफटत नेले होते, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता, राहुल गांधी म्हणाले, पोलीसांनी मला फरफटत नेलं, पण त्यातील दोन जण कानात सांगत होते की, आम्ही राजस्थानचे आणि दुसरे म्हणाले की मी हरियाणाचा आहे, आम्हाला हे करायला सांगितलं जात आहे. तुम्ही हे सरकार हटवा असे पोलीस म्हणल्याचे राहुल गांधी यांनी सांगत मोठा गौप्यस्फोट केला. जे काही घडलं, त्यात पोलीसही आनंदी नव्हते. असे ते म्हणाले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.

Rahul Gandhi speaks to media after being detained during NEET protest in Delhi, alleging police coercion and political pressure.
...तरच मी उपोषण सोडणार; सोनम वांगचुक यांनी सरकारकडे केल्या या २ प्रमुख मागण्या

तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी रास्त असल्याचे सांगत देशात गेल्या 10 वर्षात तब्बल 152 पेपर फुटले आहेत, तरी कोणालाही शिक्षा झाली नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com