विद्यापीठ हादरलं! पीएचडी विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; संतप्त विद्यार्थ्यांचा कुलगुरू कार्यालयावर हल्ला

Panjab University PhD Student Electrocution Death Chandigarh Protest: चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात पीएचडी विद्यार्थिनीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याने संताप उसळला. विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करत प्रशासनावर गंभीर आरोप केले.
Panjab University campus erupts in protest after PhD scholar Jyoti Yadav dies due to alleged electrocution near hostel area.
Panjab University campus erupts in protest after PhD scholar Jyoti Yadav dies due to alleged electrocution near hostel area.saam tv
Published On

चंदीगड: पंजाब विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागातील 28 वर्षीय पीएचडी संशोधक विद्यार्थिनीचा मंगळवारी गर्ल्स हॉस्टेल क्रमांक 10 जवळ विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण कॅम्पसमध्ये संताप उसळला असून विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयाबाहेरील रिकेड्स तोडत प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन केले.

मृत विद्यार्थिनीची ओळख ज्योती यादव (वय 28) अशी असून ती हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यात राहत होती. ती पीएचडीच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होती आणि तिचा साखरपुडा देखील झाला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्योती यादव गर्ल्स हॉस्टेल क्रमांक 8 आणि युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (UIET) यांना जोडणाऱ्या कच्च्या रस्त्याने जात असताना हा अपघात घडला. पावसामुळे त्या परिसरात पाणी साचले होते. त्यातच पाय घसरल्यानंतर स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात तिने जवळील विद्युत खांब पकडला, जो विद्युत प्रवाहाने जिवंत (लाईव्ह) असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तिला जोरदार विजेचा धक्का बसून तिचा मृत्यू झाला.

Panjab University campus erupts in protest after PhD scholar Jyoti Yadav dies due to alleged electrocution near hostel area.
Maharashtra News Live Update: सोनिया गांधी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलिस स्टेशनला पोहोचल्या

घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने तिला तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला सेक्टर 32 येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (GMCH) येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Panjab University campus erupts in protest after PhD scholar Jyoti Yadav dies due to alleged electrocution near hostel area.
Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

दरम्यान, विजेचा धक्का लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकृत तपास सुरू आहे. या घटनेनंतर विद्यापीठात संतापाची लाट उसळली. शेकडो विद्यार्थी कुलगुरू कार्यालयाबाहेर जमले आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलक विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडून कार्यालयात प्रवेश केला आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर विद्यार्थी नेत्यांच्या प्रतिनिधी मंडळाला कुलगुरू रेणू विग यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी कार्यकारी अभियंता (XEN) आणि संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन आणि राजीनामा, तसेच उच्चस्तरीय चौकशी आणि पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

Panjab University campus erupts in protest after PhD scholar Jyoti Yadav dies due to alleged electrocution near hostel area.
Maharashtra News Live Update: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला

विद्यार्थ्यांनी असा आरोप केला की, याच ठिकाणी यापूर्वीही एका विद्यार्थ्याला विजेचा धक्का बसला होता. तरीही प्रशासनाने त्या ठिकाणचा वीजपुरवठा बंद का केला नाही किंवा परिसर सुरक्षित का केला नाही, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. ही घटना कुलगुरू रेणू विग यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी घडली असून त्यांच्या उत्तराधिकारी किंवा कार्यकाळवाढीबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे आणि कुलगुरू कार्यालयाबाहेरील आंदोलनामुळे विद्यापीठ प्रशासनावर कॅम्पस सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन घटनास्थळी तैनात असून आंदोलन सुरूच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com