Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

Marathi Breaking Live Headlines Updates : सोनम वांगचुक यांचं जंतर मंतरवर उपोषण, राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात, आषाढी वारी अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज पंढरपुरात 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी निघाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील , राजू शेट्टी , आमदार सतेज पाटील, अमित देशमुख, कैलास पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील अशा नेत्यांच्या उपस्थितीत मुसळधार पावसातही दिंडी निघाली.

सीबीआयचे पथक पुन्हा लातूरमध्ये, न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवराज मोठेगावकर च्या क्लासेसची चौकशी सुरू

नीट परीक्षेचा निकाल जाहीर होताच, पुन्हा CBI ने लातूरमध्ये एन्ट्री केली आहे, प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याच्या लातूर मधील आरसीसी कोचिंग क्लासेस वर, अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. मागच्या दोन तासापासून सीबीआयच्या अधिकाऱ्याकडून काही विशिष्ट कागदपत्र ,आर्थिक व्यवहार, यासह इतर चौकशी सुरू आहे.

बरडमध्ये माऊलींच्या पालखी मुक्कामी भक्तिभावात समाजआरती

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा बरड येथे मुक्काम झाला असून सायंकाळी पालखीतळावर समाजआरती भक्तिमय वातावरणात पार पडली ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला उद्या सकाळी सहा वाजता माऊलींची पालखी नातेपोते मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

खारघर, वाशी, बेलापूर, नेरूळ आणि सानपाडा या ठिकाणी पावसाची दमदार हजेरी

खंडाळा येथील शाळेच्या वेळेत मुख्याध्यापिका झोपेत

यवतमाळच्या नेर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून शाळेच्या वेळेत मुख्याध्यापिका अस्ताव्यस्त अवस्थेत झोपलेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या कर्तव्यात कसूर करणाऱ्या मुख्याध्यापिकांवर ग्रामस्थांनी गंभीर आरोप केलाय.या प्रकरणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर ढोके यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकत संबंधित मुख्याध्यापिकेची तातडीने बदली करण्याची मागणी केली जात आहे.

रायगडमध्ये ठाकरे सेनेचे रामरक्षा आंदोलन

शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज रायगडच्या महाडमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात रामरक्षा आंदोलन केले. या निमित्ताने महाडमधील श्रीराम मंदीरा बाहेर रामरक्षा म्हणत महाआरती करण्यात आली. या वेळी राम मंदीरातील चोरीचा विरोध करणारे बॅनर झळकवण्यात आले. राम मंदिरातील चोरीचा पैसा आमदार, खासदार फोडण्यासाठी केल्याचा आरोप करीत हे आंदोलन घरोघरी पोहचवण्याची घोषणा रायगडचे संपर्क प्रमुख संजय कदम यांनी केली.

नंदुरबारमध्ये ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

नंदुरबार मध्ये फ्लिपकार्ट पार्सल घोटाळ्याचा पर्दाफाश...

नंदुरबारमध्ये ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक....

नव्या वस्तू काढून पार्सलमध्ये ठेवायचे जुन्या वस्तू फ्लिपकार्ट कंपनीलाही लावला चुना....

गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...

10 एलईडी टीव्ही, एसी, गिझर आणि होम थिएटरसह 3 आरोपी जेरबंद....

डॉक्टरांवरील हल्ला प्रकरणात शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द

शनिवारी झालेल्या एका विशेष सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द केला. कल्याणमधील एका रुग्णालयात तीन डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने म्हात्रे आणि त्यांच्या चार साथीदारांना १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले आहेत.

वाशिमच्या रिसोड तालुक्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस

वाशिमच्या रिसोड तालुक्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडलाय. गेल्या दहा दिवसापासून जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली असताना आज या रिमझिम पावसामुळे काही प्रमाणात पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

आताचं हिंदुराष्ट्र आमच्या संकल्पनेतलं नव्हत - ठाकरे

नागपुरात झालेल्या रामरक्षा पठण आंदोलनात बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "आम्ही रामरक्षक आहोत," असे म्हणत त्यांनी सोनम वांगचुक यांची अतिरेक्यांप्रमाणे उचलबांगडी केल्याचा आरोप केला. "आताचं हिंदुराष्ट्र आमच्या संकल्पनेतील नाही. मंदिरे लुटली, पेपर फुटले आणि पक्ष फोडले जात आहेत," अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.

तुकाराम मुंडे यांची धडक मोहीम! आता उल्हासनगरातही FDA ची कारवाई

तुकाराम मुंडे यांची धडक मोहीम! आता उल्हासनगरातही FDA ची कारवाई;

म्हशींना जादा दूधासाठी दिली जाणारी ६१२ ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त

परभणीत हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

परभणी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयाने कडक आदेश जारी केले आहेत.हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून,त्यांच्या सेवापुस्तकातही त्याची नोंद केली जाणार आहे.

सोनम वांगचुक यांच्या मागणीच्या समर्थनात बुलढाण्यात एक दिवशीय बैठा सत्याग्रह

दिल्ली येथे गेल्या वीस दिवसापासून सुरू असलेले सोनम वांगचुक यांचे उपोषण आज दिल्ली पोलिसांनी उधळून लावल्याचा आरोप करत, त्यांच्या मागण्यांच्या समर्थनात बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रवीण सुरडकर यांनी एक दिवसीय बैठा सत्याग्रहाला सुरुवात केली आहे

लातूरमध्ये पुन्हा CBI ची इंट्री, नीट पेपर फुटी प्रकरणात पुन्हा सीबीआय करणार तपासणी

नीट पेपर फुटी प्रकरणातील तपासासाठी पुन्हा लातूरमध्ये सीबीआयच्या पथकाने एन्ट्री केली आहे, पुण्यावरून हे सहा अधिकाऱ्यासह पथक लातूरमध्ये दाखल झाले आहे, कालच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, आज लातूरमध्ये सीबीआयचे दोन पथक धडकले आहेत.., काही खाजगी क्लास चालक, आणि प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी होणार आहे.

पुण्यात आत्महत्या केलेल्या बांधकाम ठेकेदार खलील शेख यांचं कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे भेटण्यासाठी पोहचले

याप्रकरणात रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल

आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

भुसावळ वाहन दंडाच्या बनावट लिंकचा सायबर सापळा भुसावळच्या व्यापाऱ्याला साडेसहा लाखांचा गंडा

जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये वाहनावर दंड असल्याचा बनावट संदेश पाठवून एका व्यापाऱ्याची तब्बल ६ लाख ४७ हजार ३३३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे.

सिंधी कॉलनीतील व्यापारी मनीष मोटूमल सचदेव यांच्या मोबाईलवर वाहन दंड भरण्याची बनावट लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये एपीके फाइल डाउनलोड झाली आणि सायबर भामट्यांनी मोबाईलचा ताबा मिळवत टप्प्याटप्प्याने खात्यातून लाखो रुपये परस्पर काढले.

सोनम वांगचूक यांना उचलणं ही हुकूमशाही आहे, जालन्याचे काँग्रेसचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांची टीका

दिल्लीच्या जंतरमंतरवर सोनम वांगचूक यांचं आंदोलन सरकारने बळाचा वापर करून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका जालन्याचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांनी केलीये.

वांगचूक यांचं आंदोलन लोकशाही मार्गाने सुरु होतं. मात्र सरकारने पोलिसांचा बळाचा वापर करून वांगचूक यांना उचलं आहे.

ही हुकूम शाही असून 2029 ची निवडणुकही हे सरकार होऊ देणार आहे की नाही असा प्रश्न पडला असल्याची टीका काळे यांनी केंद्र सरकारवर केलीये.

आज उद्धव ठाकरे यांचे नागपुरात रामरक्षा पठण करत आंदोलन 

- आज उद्धव ठाकरे यांचे नागपुरात रामरक्षा पठण करत आंदोलन

- उद्धव ठाकरे यांच्या आंदोलसाठी व स्वागताचे लावलेले बॅनर महापालिकेने काढले

- नागपूरच्या रेडिसन ब्लु हॉटेल चौकात कारवाई

- या चौकजवळील हॉटेल मध्ये उद्धव ठाकरे आहे मुक्कामी

पुणे बेंगलोर महामार्गावर मध्यरात्री थरार, अंदाधुंद गोळीबारात एक जण गंभीर जखमी

पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रजजवळ असलेल्या इंदोली फाटा येथे मध्यरात्री अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मित्रांमधील पैशातील व्यवहाराच्या वादातून की भाईगिरीच्या गॅंगवॉरमधून ही घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

नीट'चा निकाल पुन्हा वादात! बीडच्या वडवणी मधील विद्यार्थिनीचा आक्षेप 

नीट यूजी २०२६'चा निकाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोअर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केला आहे. बीडच्या वडवणीतील ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनी पेपर सोडल्यानंतर तिने घरी येतात पाहिले असता 720 पैकी तब्बल 702 गुण मिळणे अपेक्षित होते. मात्र मिळालेल्या ओएमआर शीट चुकीची असल्याचा दावा तिने केला आहे.. तिचे प्रत्यक्ष स्कोर कार्ड पाहिले असता 87 गुण मिळाले आहेत.. यात माझ्याकडे प्रश्नपत्रिका पुरावा असल्याचा दावा देखील तिने केला आहे.

रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री आदिती तटकरे यांचं महत्वपूर्ण विधान

भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर सोपवला आहे. शेवटी आमच्या सर्वांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे. पालकमंत्री हे केवळ एक पद आहे पण जिल्ह्यात दोन मंत्री आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे गेलं पाहिजे

राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या मालेगावच्या डोंगराळे प्रकरणाची सुनावणी सुरू 

राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या मालेगावच्या डोंगराळे प्रकरणाची सुनावणी सुरू..

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करून करण्यात आली होती हत्या.

घटनेतील नराधमाची साक्ष सुरू...

आरोपी व विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर.

या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात...

नसरापूर निकालनंतर मालेगावच्या निकालाकडे राज्याचे लक्ष.

डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीत फणा काढून बसला नाग

डोंबिवली पूर्व येथील रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटर मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिकीट काउंटर परिसरातील खिडकीवर भला मोठा एक नाग फना काढून बराच वेळ झाला येऊन बसला होता.नागला बघितल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला व सर्प मित्रांना बोलावले आहे. ह्या नागाला बघण्यासाठी प्रवाशांची एकच गर्दी झाली आहे.प्रवासी टिकट काढण्यासाठी उभे होते मात्र नाग दिसल्याने एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

एनडीए मध्ये जाण्याच्या चर्चा केवळ माध्यमात; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची माहिती 

एनडीए मध्ये जाण्याच्या चर्चा सुरू नाहीत. आम्हाला निमंत्रणच नाही. प्रसार माध्यमातून येणाऱ्या बातम्या मधून करमणूक होत असल्याची सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.

अभिजीत दिपकेंवर आंदोलनात शाईफेक

अभिजीत दिपकेंवर आंदोलनात शाईफेक

जंतर- मंतर मैदानाबाहेर गोंधळ

जंतर- मंतर मैदानात मोठ्या संख्येने पोलित तैनात

अमित शहांना हटवा, देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय गृहमंत्री करा - नवनाथ वाघमारे

गृहमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले त्यामुळे तडीपार असलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील आंदोलनावरून ओबीसी आंदोलन नवनाथ वाघमारे यांची मागणी.

तर अमित शहा यांना काढून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय गृहमंत्री केलं पाहिजे-नवनाथ वाघमारे

नीट एक्झाम मध्ये पुन्हा एकदा लातूर पॅटर्नचा दबदबा, 500 पेक्षा अधिक विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र 

देशभरात झालेल्या NEET Re-Exam च्या निकालात पुन्हा एकदा 'लातूर पॅटर्न'चा दबदबा कायम राहिला आहे. लातूरमधील विविध नामांकित शिक्षण संस्था आणि खाजगी क्लासेस मधील 1,500 हून अधिक विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र झाले आहेत, जिल्ह्याच्या शैक्षणिक परंपरेला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

सांगली शहरासह आसपासच्या परिसरात पावसाची दमदार हजेरी

गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाचं सांगली जिल्ह्यामध्ये कमबॅक झालेयं. सांगली, मिरज शहरासह आसपासच्या परिसरात पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. परंतु आता सांगली जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी सुखावलाय.

अमित ठाकरे जंतर मंतरवरील आंदोलनस्थळी दाखल

आज पासून अभिजित दिपके आमरण उपोषणाला बसले आहेत

या आंदोलनस्थळी अमित ठाकरे जंतर मंतरवरील आंदोलनस्थळी दाखल

केतन अग्रवाल हत्या प्रकरण,  अग्रवाल कुटुंबीय दगडूशेठ गणपती चरणी

केतन हत्याप्रकरणी न्यायासाठी संजना अग्रवाल यांची दगडूशेठ गणपती चरणी प्रार्थना

केतन हत्याप्रकरणी न्याय मिळावा, या मागणीसाठी केतन अग्रवाल यांची बहीण संजना अग्रवाल यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत प्रार्थना केली

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी उजनी जलाशयाजवळील जुनी पाईपलाईन फुटली

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी उजनी जलाशयाजवळील जुनी पाईपलाईन फुटली

टेंभुर्णी जवळ पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी गेलं वाया, पाईपलाईन फुटल्यामुळे दिसून आले मोठे फवारे

उजनी धरणातून सोलापूर शहराला जुन्या पाईपलाईन द्वारे केला जातो पाणीपुरवठा.

Beed : पेपरफुटीनंतर आता गुणांचा 'महाघोटाळा'

परीक्षेच्या निकालात गुणांचा मोठाघोळ समोर आला असून, उत्तरपत्रिकेत तपासले असता 522 गुण असणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्कोअर कार्डवर केवळ 95 गुण दाखवले गेले आहेत. बीडमधील सोहम गवते आणि ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थ्यांच्या निकालात असा फरक आढळल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

Accident News : मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसचा अपघात

जून्या मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे सावंतवाडी-रत्नागिरी एसटी बसचा अपघात झाला.

पाऊस आणि निसरडा रस्ता यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर बस गटारात कलंडली.

जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखीचा नगारखाना इंदापूर मधील रिंगण ठिकाणी पोहचला

जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखीचा नगारखाना इंदापूर मधील रिंगण ठिकाणी पोहचला

दिंड्या मैदानावर येण्यास सुरवात

काही वेळात पालखी मैदानात येईल सोबत अश्व मैदानात येईल.त्यानंतर रिंगण ठिकाणी येत आहे

काही वेळात रिंगणाला सुरुवात होईल

संजय राऊत राम नगर मंदिरात आणि सभेच्या ठिकाणी तयारीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले

- संजय राऊत राम नगर मंदिरात आणि सभेच्या ठिकाणी तयारीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले आहेत

- मंदिर परिसरात फुलांची सजावट केली जात असून मंदिर परिसराच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर उद्धव ठाकरे यांची छोटी सभा होणार आहे

- त्यासाठी उभारल्या जाणाऱ्या स्टेज आणि तयारीचा आढावा संजय राऊत घेत आहे

अंबड पुरवठा विभागाची कारवाई, तब्बल 6 लाख 37 हजार 418 रुपयांचा मुद्देमाल जप्त

लन्यातील अंबड येथे खाजगी गोदामात साठवून ठेवलेले 170 क्विंटल धान्य जप्त करण्यात आल आहे.

अंबड पुरवठा विभागाने हि कारवाई केली असून या कारवाईत तब्बल 6 लाख 37 हजार 418 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Nashik : विहिरीतील पाण्यावर भात लावणी सुरू

पावसाने ओढ दिल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बागलाण मधील काही भागातील भात शेतीची लावणी रखडली होती

15 दिवसांपूर्वी नारकोळ, जखोड या भागात झालेल्या पावसामुळे बऱ्या पैकी पाणी विहिरींना उतरले होते

मात्र मध्येच पावसाने उसंत घेल्याने रोपांवर ताण पडला,काल पासून रिमझिम पाऊस सुरू झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी भात लावणीस सुरुवात केली आहे.

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपुर्ण तालुका हादरला आहे.

करडे येथील भैरवनाथ मंदिराजवळ आठ जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची गंभीर घटना समोर आली

संबंधित व्यक्तीने प्रसंगावधान राखत पाण्यात उडी मारल्याने त्याचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिजित दिपके आजपासून आमरण उपोषण करणार

बदलापुरात FDA ची पुन्हा कारवाई, दोन टपऱ्या सील

बदलापुरात FDA ची पुन्हा कारवाई, दोन टपऱ्या सील

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा

नाशिकमधील धक्कादायक घटना

तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः केली आत्महत्या ?

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास एका तरुणाचा पोलीसांना मृतदेह आढळला

इंदिरानगर पोलीसांकडून अधिक तपास सुरू

मालवण जेटीचे छप्पर बनले धोकादायक

मालवण येथून सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांना जाण्यासाठी नवी जेटी बांधण्यात आली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या जेटीच्या छप्परावरील लोखंडी पत्रे तुटले असून ते कधीही खाली पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. जेटीच्या या दुरवस्थेबाबत बंदर विभागाचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सध्या होडी सेवा बंद असल्यामुळे पर्यटकांना या ठीकाणी येण्यास बंदी आहे. बंदीचा कालावधी संपण्या अगोदर या जेटीच्या छप्पराची दुरूस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

पहाटेच्या पूजेनंतर माऊलींचा पालखी सोहळा फलटणहून बरडकडे मार्गस्थ

फलटण येथील पहाटेची पूजा विधीवत संपन्न झाल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी बरडकडे प्रस्थान झाला टाळ मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात वारकरी भक्तिभावाने माऊलींसोबत मार्गस्थ झाले

- बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी धक्कादायक खुलासे

- अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि शासन आदेशाने फसवणुकीचे जाळे तयार केले गेले

- तब्बल १६० कोटींच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील आरोपी प्रशांत वाडीलेच्या मोबाईल डेटामधून पुरावे हाती

- ५० हून अधिक संस्था, १०० पेक्षा जास्त शिक्षक तसच अनेक शाळांच्या मान्यता, वेतन मंजुरी आणि शालार्थ आयडी संदर्भातील कागदपत्रे सापडली

दत्तनगर येथे सह दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला मारहाण!

पुणे: आंबेगाव बुद्रुक दत्तनगर येथील हवेली २० दुय्यम निबंधक कार्यालय येथे शुक्रवारी सह दुय्यम निबंधक अधिकारी व वकील यांच्या दस्त नोंदणी विषयावरून शाब्दिक वाद झाले. या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. त्यामुळे कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.त्यानंतर सहदुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र नामदेव कोळी व कर्मचारी यांनी आंबेगाव पोलिस स्टेशन येथे जाऊन तक्रार दिली. पुढील तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.

रामरक्षा विरुद्ध हनुमान चालीसा; ठाकरे-राणा आमनेसामने.. अमरावतीत हनुमान गडीवर नवनीत राणा करणार हनुमान चालीसा पठाण...

अयोध्येतील कथित दान अपहारावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाली असून, पक्षाने राज्यभरात रामरक्षा आंदोलन छेडले आज दुपारी उद्धव ठाकरे थेट नागपुरात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून माजी खासदार नवनीत राणा आज अमरावती शहराजवळील प्रसिद्ध हनुमान गढी येथे हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत,उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला माजी खासदार नवनीत राणा हनुमान चालीसानं उत्तर देणार आहे, आपण अमरावतीमध्ये या आपलं स्वागत आहे आपण सोबत हनुमान गडीवर हनुमान चालीसा पठण करू असं आव्हान नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

पुणे मनपा उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून सहा लाखांचा गंडा

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन कार्यालयातील उपायुक्तांचा पुतण्या आहे,असे सांगून एका व्यक्तीची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी वजेंद्र हनुमंत पवार या संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी वजेंद्र पवार हा एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याने महापालिकेत कर भरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा विश्वास संपादन केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com