
दिल्लीमध्ये जंतरमंतरवर अभिजीत दिपकेच्या भेटीसाठी शरद पवार गेले आहेत.
राहुल गांधी जंतर-मंतर आंदोलनात सहभागी झाले आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राहुल गांंधींसोबत प्रियंका गांधीचाही सहभाग आहे. राहुल गांधी मोंदीच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत.
कुडाळ नगरपंचायत मधील सत्ताधारी भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी राजीनामा पत्र सादर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे.
सिया आणि चेतन ने ३१ मे पूर्वी रचला होता केतन ला मारण्याचा प्लॅन
लोहगडच्या पहिल्याच ट्रिप मध्ये केतन प्रकरण पूर्ण करायची दोघांची होती कल्पना
"नो रिस्क" म्हणून ३१ मे रोजी फक्त जागेची रेकी आणि लोहगड हे ठिकाण अंतिम करण्यात आलं
पेपरफुटीनंतर २० विद्यार्थ्यांनी केल्या आत्महत्या
वांगचूक यांना नाही तर सरकारने लोकशाहीला गुंडाळलं आहे
लाडक्या बहिणी म्हणून मतं मागितली आता त्यांच्यावरच लाठ्या?
कालचा दिवस देशाच्या राजकारणासाठी काळा दिवस
दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील खुडूस फाटा येथे आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सहकुटुंब पालखीचे दर्शन घेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना केली.
धुळ्यात ठाकरे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते राम मंदिर देणगी भ्रष्टाचार मुद्द्यावरून माजी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे, नवनीत राणा या राम मंदिर देणगी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ब्र शब्द देखील बोलण्यास तयार नाही, यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करून नवनीत राणा यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले होते, परंतु त्याच नवनीत राणा आता राम मंदिर देणगी भ्रष्टाचार मुद्द्यावर गप्प का असा प्रश्न ठाकरे सेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित केला आहे
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार शहरात प्रहार जनशक्ती पक्ष व सामान्य नागरिकांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
बीडच्या वडवणी येथे शरद पवार राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाचे कार्यालय जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुळे खळबळ उडाली आहे. मध्यरात्री कार्यालय पेटवतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रासेगाव जवळ फर्टिलायझर कंपनीला सकाळच्या सुमारास आग
कंपनीतून काही काळ गॅस गळती झाल्याने गोंधळ
आगीत 2 कर्मचारी जखमी
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आणली आटोक्यात
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या छायाचित्राला काळे फासून ते पायदळी तुडवत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सातपुड्यातील आदिवासी बांधवांचे समर्थन....
भर पावसात धडगाव तहसील कार्यालयासमोर आदिवासी समाज संघटनांच्या वतीने एक दिवशी आंदोलनाला सुरुवात....
एक दिवशी आंदोलनात विद्यार्थ्यांच्या समावेश शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामाची मागणी कायम..
दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर नंदुरबार शहरासह परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात
दमदार पावसाच्या प्रतीक्षा अजूनही कायम
दमदार पावसाभवी जिल्ह्यात केवळ 40% पेरण्या
आंदोलनामध्ये काही लोक चांगल्या विचाराने आले आहेत. पण काही लोक आपला अजेंडा घेऊन घुसले आहेत. त्यांना नीट काय आहे, हेही माहिती नाही. काही राजकीय पक्ष त्या त्या राज्यात रिजेक्ट केले आहे, तेही त्यात सामील झाले आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले
दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनात अनेक राजकीय पक्ष, संघटना फायदा घेत आहेत. दिल्लीमध्ये नेतृत्वहीन व्यवस्था पाहायला मिळाली. पोलिसांवर दगडफेक झाली. कोणत्याही सरकारला नागरिकांवर लाठीचार्ज करायला आवडत नाही. काल जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसेल तर अनावशक घटना घडल्या आहेत. पोलिसांनी संयमही दाखवला आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे. याच्या खोलात गेलो तर सर्व आंदोलकांवर आरोप करू इच्छित नाही. पण त्यात काही स्वार्थी लोक घुसलेत, कारण त्यांना फक्त आराजकता पसरवायची आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लोकशाहीमध्ये आंदोलन करण्यचाा अधिकार सर्वांना आहे. आंदोलन करताना संविधानाने दिलेले हक्क आणि जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे. कोणीही परवानगी घेऊन शांततापूर्ण आंदोलन करावी. जाणूनबुजून, परवानगी न घेता आंदोलन केले तर कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आषाढी वारी म्हणजे केवळ भक्तीचा सोहळा नाही तर लाखो करोडो रुपयांची उलाढाल असलेली मोठी बाजारपेठ देखील आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सध्या कुंकू , बुक्का आणि अष्टगंधाला भाविकांकडून सर्वाधिक मागणी आहे. मंदिर परिसर आणि पंढरपूर मध्ये सध्या कुंकू बुक्का आणि अष्टगंधाच्या बाजारपेठा सजल्या आहेत. विठुरायाच्या पूजेसाठी आणि वारकऱ्यांना कपाळी लावण्यासाठी याला मोठी मागणी आहे
अलिबाग वडखळ मार्गावर शिवशाही बसला अपघात
चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली शिवशाही बस कलंडली
सुदैवाने कोणीही जखमी झाला नाही
साईड पट्टीवरून टायर खचला आणि बस क्लिनर बाजूला कलंडली
अलिबाग येथून पनवेलला जात असताना सकाळी 8 वाजव्याच्या सुमारास पेजारी चेक पोष्ट नजीक झाला अपघात
यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून अनेक भागांत रिमझिम पाऊस सुरू आहे. हलक्या सरींमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.रिमझिम पावसामुळे नागरिक छत्र्यांसह घराबाहेर पडताना दिसत आहेत.पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. रिमझिम सरींमुळे शहरासह ग्रामीण भागातही आनंदाचे वातावरण आहे.
वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनासाठी आज वाढवण सह परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात . वाढवण , चिंचणी , वरोर भागाला पोलीस छावण्याचं स्वरूप . महामार्गासाठी लागणाऱ्या जागेतील झाडांवर आज तोडक कारवाई . कारवाई विरोधात स्थानिक आक्रमक होण्याची शक्यता . खबरदारी म्हणून हजारो पोलीस वाढवण सह परिसरात दाखल . स्थानिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या पोलिसांनी अडवून धरल्या .
महाड तालुक्यातील शिवथर येथील श्री समर्थ रामदास विद्यामंदिर माध्यमिक शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शाळेच्या इमारतीतील स्लॅबचा काही भाग कोसळल्याचा, तर खांबांना मोठमोठे तडे गेल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या शाळेत सुमारे 70 ते 80 विद्यार्थी शिक्षण घेत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालक आणि ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.
कळंबोली पुलावर लोखंडी होर्डिंग कोसळून अपघात; प्रशासनाकडून तातडीने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू
कळंबोली सर्कल ते मुंब्रा रोडवरील कळंबोली पुलाच्या (ब्रिज) सुरुवातीला असलेले एक मोठे लोखंडी होर्डिंग अचानक खाली कोसळल्याची घटना घडली आहे.
महाड तालुक्यातील शिवथर येथील श्री समर्थ रामदास विद्यामंदिर माध्यमिक शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शाळेच्या इमारतीतील स्लॅबचा काही भाग कोसळल्याचा, तर खांबांना मोठमोठे तडे गेल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या शाळेत सुमारे 70 ते 80 विद्यार्थी शिक्षण घेत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालक आणि ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित संस्था आणि प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
अंबरनाथ तालुक्यातल्या चामटोली ग्रामपंचायतीत गोपनीय कागदपत्रांची खासगी व्यक्तींनी हाताळणी केल्याप्रकरणात आता सरकारी बाबूंनी घुमजाव केलंय. या प्रकरणात ज्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांनी कागदपत्रांची चोरी केली नसून गैरसमजातून पोलिसांत तक्रार दिल्याचा लेखी अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर या प्रकरणात संशयाचं वादळ निर्माण झालंय. तर या अहवालानुसार मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांनी न्यायालयात 'क' समरी साठी अर्ज दाखल केलाय. दुसरीकडे भ्रष्टाचार दडपण्यासाठीच अधिकाऱ्यांचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप तक्रारदार धनाजी ईरमाळी आणि सुकऱ्या हंबीर यांनी केलाय. या प्रकरणात आता हायकोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलय.
केंद्र सरकारने चर्चेसाठी जंतर मंतरवर यावे
१५० हून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत.
जंतर मंतर परिसरात दगडाने भरलेले ट्रक आले कुठून?
सरकारला विद्यार्थ्यांची चिंता नाही.
मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही.
एका बाजूला सरकार चर्चेला बोलवलेयत, दुसऱ्या बाजूला लाढीचार्ज करतेय.. आता सरकारनेच जंतर मंतरवर यावे.
नवी दिल्ली येथील संसद वाचनालय इमारतीतील जी. एम. सी. बालयोगी सभागृहात (G.M.C. Balayogi Auditorium) एनडीए संसदीय दलाची 'मंगल मिलन' बैठक सुरू झाली आहे.
या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएचे सर्व प्रमुख नेते आणि खासदार उपस्थित आहेत.
CJPच्या आंदोलनाला आता कलाकारांचाही पाठिंबा मिळताना दिसत आहे. गायिका सायली खरे यांनी आपल्या सुरांच्या माध्यमातून CJP आंदोलनाला समर्थन दिलं आहे.
सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर कलाकारांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे आंदोलनाला नवा आवाज मिळत असल्याची चर्चा आहे. सायली खरे यांनी गाण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आणि आंदोलकांच्या मुद्द्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाखो रुपयांची शासकीय औषधे सेप्टिक टँकमध्ये फेकून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. याशिवाय मुदत संपलेली औषधे आरोग्य केंद्राच्या आवारात जाळण्यात आल्याचेही समोर आले आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. औषधांची अशा प्रकारे विल्हेवाट लावल्याने आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा समोर आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ बुलढाण्यात रमाईच्या लेकी ग्रुपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सरकारने सद्बुद्धीने निर्णय घ्यावा, शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि राष्ट्रपतींनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले. यावेळी शांततेच्या मार्गाने सुरू असलेले सोनम वांगचुक व अभिजित दीपके यांचे आंदोलन दडपणे हा लोकशाहीवरील आघात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. तसेच, लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी जखमी झाल्याचा निषेध व्यक्त करत हा प्रकार हुकूमशाहीचे लक्षण असून देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन करणारा असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आणि महाआरोग्य शिबिराच्या बॅनरवरून वाद निर्माण झाला आहे. या बॅनरवर महसूल विभागासह इतर शासकीय विभागांची नावे आहेत. त्याचबरोबर भाजपचे आमदार बस्वराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील यांचे फोटो, भाजपचे कमळ चिन्ह आणि शरण पाटील फाउंडेशनचे नावही छापण्यात आले आहे. त्यामुळे हा सरकारी कार्यक्रम आहे की एखाद्याचा राजकीय प्रचार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरकारी कार्यक्रमाच्या बॅनरवर पक्षाचे चिन्ह आणि खासगी फाउंडेशनचे नाव कशाच्या आधारावर वापरण्यात आले, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे. या प्रकारामुळे उमरग्यात चांगलीच चर्चा रंगली असून, आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने २० जुलैपर्यंत जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांत सरासरीच्या केवळ ३१.५० टक्के पावसाची नोंद झालीय.. या तीन जिल्ह्यात खरीप हंगामाची ७९ टक्के पेरणी पूर्ण झाल्या. कमी पावसामुळे काही तालुक्यांमध्ये पेरणी रखडली. पिकांच्या उगवणीवरही परिणाम होत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले. विभागीय कृषी सहसंचालक यांच्या अधिपत्याखालील जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत आतापर्यंत सरासरी ६४६.५३ मि.मी. पावसाच्या तुलनेत २०४.०७ मिमी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६३७.५ मिमीच्या तुलनेत २००.४ मिमी (३१.४४ टक्के), जालना जिल्ह्यात २४०.५ मिमी (३६.२६ टक्के), तर बीड जिल्ह्यात १७१.३ मिमी (२६.८१ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. विभागातील २१ लाख ४२ हजार २३ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी १७ लाख ८० हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
* नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
* नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
* भारतीय हवामान विभागाने मंगळवार ते गुरुवार दरम्यान केला यलो अलर्ट जारी
* घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा.
* वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता.
* त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा तालुक्यातील घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहणार
* शहरात मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज.
* घाट परिसरात प्रवास करताना सावधगिरी बाळगा, वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी केली. त्यात एका वाहनात ३ लाख ८६ हजार ९०८ रुपयांचा गुटखा, वाहन आणि मोबाइल मिळून १२,०६,९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या मोहिमे दरम्यान पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, तस्करीसाठी वापरली जाणारी कार आणि दोन मोबाइल फोन असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना घटना स्थळावरून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाने मागच्या 2 महिन्यापासून दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेलाय तर,जुलै महिना देखील पावसाची नाच कोरडा जाण्याच्या वाटेवर आहे.अनेक भागांतील विहिरी, ओढे आणि शेततळी कोरडी पडू लागल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. चाकूर तालुक्यातल्या दापक्याळ शिवारात पावसाअभावी टोमॅटोसह भाजीपाला पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरने पाणी आणून सिंचन करण्याची वेळ आली आहे.
शेअर ट्रेडिंग, क्रिप्टो टास्क आणि बँक खाते हॅक करून नागरिकांची लाखो रुपयांची लूट
शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत असून, केवळ एकाच दिवसात सायबर सेल आणि विविध पोलिस ठाण्यांमध्ये मिळून तब्बल ४२ फसवणुकीचे गुन्हे दाखल
काही ठिकाणी नेट बँकिंगचे कस्टमर आयडी आणि पासवर्ड हॅक तर कुठे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जास्त परताव्याचे आमिष लाखांची फसवणूक
कोथरूड, भारती विद्यापीठ, बाणेर यासह शहरातील इतर पोलिस ठाण्यांमध्ये सायबर गुन्हे
श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्माचा आधार देण्याचा दावा करणाऱ्या एका महाराजांवर तब्बल दहा वर्षे एका महिलेचे कथित लैंगिक,मानसिक, शारीरिक व आर्थिक शोषण केल्याचा गंभीर आरोप झाल्याने अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी 18 जुलै रोजी आरोपी दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज, रा. आनंदमठ, चांदूर रेल्वे, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
पावसाळ्यात जड वाहने, मालवाहु वाहने अडकण्याच्या किंवा बंद पडण्याच्या घटना घडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाययोजना
या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून पंढरपूर आणि दादर दरम्यान दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार
या दोन गाड्या २२ जुलै ते २९ जुलै दरम्यान धावणार
या गाडीला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी थांबे असणार
सहायक प्राध्यापक पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राज्यस्तरीय सेट परीक्षा लांबणीवर
६ सप्टेंबर रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची सी टी ई टी होणार असल्यामुळे सेट परीक्षेच्या तारखेत बदल
राज्य शासनाची समन्वयक संस्था, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र, गोवा राज्यात सेट परीक्षा आयोजित केली जाते.
महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेला पुणे शहरात आणि परिसरात ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद
ग्राहकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरण विभागाच्यावतीने गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन मेळावे
पुणे परिमंडलात एकूण १४ लाख १३ हजार १९३ स्मार्ट मीटर बसविण्यात आली असल्याची महावितरण विभागाची माहिती
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीतील दुसरे गोल रिंगण आज खुडूस फाटा येथे रंगणार आहे. माऊलींच्या अश्वाच्या दौडीसह लाखो वारकरी आणि भाविक या भक्तिमय सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.
माळशिरसहून मार्गस्थ झालेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज सकाळचे आकर्षण खुडूस फाटा येथील दुसरे गोल रिंगण असणार आहे. रिंगण सोहळ्यानंतर पालखीचा दुपारचा विसावा विंझोरी ज्ञानेश्वरनगर येथे होईल तर त्यानंतर धावबावी माळ येथे थांबत पालखी रात्रीच्या मुक्कामासाठी वेळापूर येथे दाखल होणार आहे. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात आजचा पालखी सोहळा भक्तिरसात रंगणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुण्यात पुरस्कार प्रदान सोहळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार
१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पुण्यातील कटारिया हायस्कूल च्या मैदानावर पार पडणार पुरस्कार सोहळा
१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांची १०६ वी पुण्यतिथी
टिळक स्मारक ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांनी दिली माहिती
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.