देशातील मोठ्या बँकेत महाघोटाळा! ७.४ कोटींच्या खऱ्या नोटा काढून ठेवल्या नकली नोटा; 'तो' कारनामा पाहून पोलीसही हादरले

PNB Fake Currency Scam : उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये कोट्यवधी रुपयांच्या खऱ्या नोटांऐवजी बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे.
PNB Fake Currency Scam
PNB Fake Currency Scam Saam TV marathi
Published On

Punjab National Bank fake currency scam latest news : पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) तिजोरीतून (Vault) तब्बल ७.४ कोटी रुपयांच्या खऱ्या नोटा गायब करून त्याऐवजी नकली नोटा ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्या सुरक्षेवरच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या महाघोटाळ्यामुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील पीएनबीच्या मुख्य शाखेत मुख्य तिजोरीची (Currency Chest/Vault) तपासणी आणि ऑडिट सुरू असताना हा प्रकार समोर आला. बँकेच्या तिजोरीत ठेवलेल्या कॅश बंडलमध्ये खऱ्या नोटांऐवजी बनावट नोटा असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. हा केवळ चोरीचा प्रकार नसून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने बँकेच्या आतल्याच व्यक्तीने किंवा कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हा बदमाशीचा खेळ खेळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. विशेष तपास पथकाद्वारे (SIT) या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. बँकेचे सीसीटीव्ही फुटेज, लॉकर आणि तिजोरीच्या चाव्या कोणाकडे होत्या, तसेच ऑडिट रिपोर्टची पडताळणी केली जात आहे. या गंभीर प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

पीएनबीचे नोडल अधिकारी अरुण कुमार चौबे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक रवी कुमार, करन्सी चेस्ट व्यवस्थापक सुशील शर्मा आणि अमित कुमार यांना मुख्य संशयित म्हणून नाव देण्यात आले आहे. पीएनबीच्या मुख्य उपव्यवस्थापक निशा सिंह यांच्या म्हणण्यानुसार, १० ऑगस्ट रोजी आरबीआयला पाठवलेल्या रोख रकमेत ४.३६ लाख रुपयांची तूट असल्याचे उघड झाल्यावर या घोटाळ्याचं काळं सत्य समोर आले.

या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाविरोधात पुरावे आणि संपूर्ण माहिती हाती येताच, तपासाचा निष्कर्ष जाहीर केला जाईल. सध्या बनावट नोटांच्या अंतिम आकडेवारीची पडताळणी आणि मतमोजणी अद्याप सुरूच आहे.
-निशा सिंह, पीएनबी, मुख्य उपव्यवस्थापक

सहारनपूरचे डीआयजी अभिषेक यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. संशयितांविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. सध्या नोटांची मोजदाद सुरू असून, सखोल चौकशीनंतर अपहार केलेली संपूर्ण रक्कम जप्त केली जाईल. दरम्यान, बँकेतील खऱ्या नोटा काढून बनावट नोटांची तस्करी कशी झाली? याचा माग काढण्यासाठी आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिकारी सध्या बँकेचे आर्थिक व्यवहार, जुने ऑडिट रिपोर्ट आणि तिजोरीच्या (Currency Chest) परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारीक फेरपडताळणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com