Good News: मोठी बातमी! ८ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट, महागाई भत्ता ५३ टक्क्यांनी वाढला; किती रुपये मिळणार?

DA Hike 2026 latest news: पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा दणक्यात साजरी होणार आहे. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
Good News: मोठी बातमी! ८ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट, महागाई भत्ता ५३ टक्क्यांनी वाढला; किती रुपये मिळणार?
DA Hike 2026 latest newssaam tv
Published On: 
  • मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

  • पंजाब सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला

  • पंजाबमधील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवर

  • यंदा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढला

पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला खुश करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट दिलं आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ५३ टक्के झाला आहे. पंजाबमधील अंदाजे ८ लाख कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना याचा फायदा होणार आहे.

पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा दणक्यात साजरी होणार आहे. पंजाबमधील सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ५३ टक्के झाला आहे. आता कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांच्या खात्यात जास्त पैसे जमा होतील. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर निश्चितच अतिरिक्त आर्थिक भार येणार आहे.

Good News: मोठी बातमी! ८ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट, महागाई भत्ता ५३ टक्क्यांनी वाढला; किती रुपये मिळणार?
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ, लेव्हल 1 ते 10 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले की, सरकार कर्मचाऱ्यांसाठी ३ टक्के महागाई भत्त्याचा हप्ता वितरित करत आहे. सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकूण ३,९८८ कोटी रुपये हस्तांतरित केले जात आहेत. राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या जीवनमानाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना पूर्ण उत्साहाने सणांचा आनंद घेता यावा यासाठी सातत्याने उपाययोजना करत आहे.

Good News: मोठी बातमी! ८ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट, महागाई भत्ता ५३ टक्क्यांनी वाढला; किती रुपये मिळणार?
DA Hike 2026: पेन्शनमध्ये थेट 3% वाढ! 60% वरून DR झाला 63%, तुमच्या खात्यात आता किती रुपये जमा होणार?

महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हे देखील स्पष्ट केले की, आमच्या सरकारच्या कार्यकाळात पंजाबमघील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाभी भत्त्यात एकूण ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता ३ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना आनंदाचे वातावरण आहे.

Good News: मोठी बातमी! ८ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट, महागाई भत्ता ५३ टक्क्यांनी वाढला; किती रुपये मिळणार?
DA Hike : दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! 4 राज्यांचा मोठा निर्णय, DA थेट 63% वर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.