DA Hike : दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! 4 राज्यांचा मोठा निर्णय, DA थेट 63% वर

Good News : दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण DA मोठी वाढ करण्यात आली आहे.
Diwali Bonanza for Government Staff
Diwali Bonanza for Government StaffSaam Tv
Published On: 

दिवाळीच्या सणाआधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारनंतर आता राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्य सरकारांनाही महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे काही राज्यांमध्ये थकबाकी (एरियर) आणि दिवाळी बोनसचाही लाभ मिळणार आहे.

राजस्थानमध्ये DA किती टक्के वाढवला?

राजस्थान सरकारने सातव्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवून ६३ टक्के केला आहे. या निर्णयाचा फायदा ७ लाखांहून जास्त कर्मचारी आणि ५ लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारकांना होणार आहे. ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू होईल. जुलै ते ऑक्टोबरचा एरियर GPF खात्यात जमा होईल. नोव्हेंबरच्या वेतनासोबत वाढीव DA सु्द्धा मिळेल. पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही जाहीर केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे.

Diwali Bonanza for Government Staff
Free LPG : दिवाळीआधी महिलांसाठी मोठी खुशखबर! गॅस सिलिंडरचे पैसे थेट खात्यात जमा होणार

तमिळनाडूमध्ये १६ लाख लाभार्थ्यांना फायदा

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पेन्शनधारकांसाठी DA आणि DR मध्ये ३ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे महागाई भत्ता ६० वरून ६३ टक्के झाला आहे. हा निर्णय १ जुलै २०२६ पासून लागू मानला जाणार असून १६ लाख लाभार्थ्यांना फायदा होईल.

Diwali Bonanza for Government Staff
SIP Investment : १० हजारांच्या गुंतवणुकीतून १ कोटींचा फंड; पाहा संपूर्ण गणित

मध्य प्रदेशात २ टक्के DA वाढ

मध्य प्रदेश सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ केली आहे. ही वाढ जानेवारी २०२६ पासून लागू मानली जाणार आहे. वाढीव DA ऑक्टोबरच्या वेतनासोबत मिळेल. जानेवारी ते सप्टेंबरचा ९ महिन्यांचा एरियर ३ समान हप्त्यात मिळेल. पेन्शनधारकांना जुलै २०२६ पासून २ टक्के वाढीव DR मिळेल.

छत्तीसगडमध्ये DA ६० टक्क्यांवर

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये २ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे DA ५८ वरून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. हा निर्णय १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होईल. त्याचा फायदा ३.८५ लाख कर्मचारी आणि १.५० लाख पेन्शनधारक अशा एकूण ५.३५ लाख लाभार्थ्यांना मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.