PUBG Game: मध्यरात्री पब्जी गेम खेळताना डोक्यातील नस फाटली; तरुणाचा तडफडून मृत्यू

Youth Dies While Playing PUBG Game In Meerut: पब्जी गेम खेळताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री पब्जी खेळताना तरुणाच्या डोक्यातील नस फाटली. मेंदूत रक्तस्राव होऊन तरुणाचा मृत्यू झाला.
PUBG Game: मध्यरात्री पब्जी गेम खेळताना डोक्यातील नस फाटली; तरुणाचा तडफडून मृत्यू
PUBG GameSaam Tv
Published On

Summary -

  • मेरठमध्ये पब्जी गेम खेळताना २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

  • मध्यरात्री गेम खेळताना डोक्यात नस फाटली

  • मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे तरुणाचा मृत्यू

  • रक्तदाब ३०० च्या वर गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये कोरियन गेमसाठी ३ सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता मेरठमध्ये भयंकर घटना घडली. मेरठमध्ये पब्जी गेम खेळताना तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाला पब्जी गेमचं अतकं व्यसन लागले होते की तो तासंतास गेम खेळायचा. मध्यरात्री पब्जी गेम खेळताना तरुणाच्या डोक्यातील नस फाटली. मेंदूत रक्तस्राव होऊन तरुणाचा मृत्यू झाला. तरुणांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याचा रक्तदाब ३०० च्यावर गेला होता. रुग्णालयात दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, खैरनगर गुलर वाली गली येथील रहिवासी असलेले प्रॉपर्टी डीलर फारूक यांचा २२ वर्षीय मुलगा मोहम्मद कैफ शुक्रवारी रात्री हेडफोन लावून मोबाईलवर पब्जी गेम खेळत होता. पहाटे ३ वाजता गेम खेळत असताना कैफ बेडवरून खाली पडला. कुटुंबीयांना हे कळताच त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. तोपर्यंत त्याचा रक्तदाब ३०० च्या पुढे गेला होता. त्याची प्रकृती गंभीर पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला दिल्लीला रेफर केले.

PUBG Game: मध्यरात्री पब्जी गेम खेळताना डोक्यातील नस फाटली; तरुणाचा तडफडून मृत्यू
Shocking : धक्कादायक! मुंबईतील तरुणीचा मनालीमध्ये मृत्यू, हादरवणारं कारण आलं समोर; नेमकं काय घडलं? वाचा

दिल्लीतील रुग्णालयात दोन दिवस उपचार घेतल्यानंतर रविवारी सकाळी कैफचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. कैफचा मेहुणा शाहिद म्हणाला की, कैफ कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. रक्तदाब वाढल्याने मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे कारण डॉक्टरांनी सांगितले. पब्जी गेममुळे फारूक यांचा एकुलता एक मुलगा देखील त्यांना कायमचा सोडून गेला.

PUBG Game: मध्यरात्री पब्जी गेम खेळताना डोक्यातील नस फाटली; तरुणाचा तडफडून मृत्यू
Shocking : जिगरी मित्रांनी गुपचूप किटकनाशक औषध प्यायलं; तिघांचा मृत्यू; एकाची मृत्यूशी झुंज

कैफच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कैफच्या कुटुंबीयांनी सांगितले की, कैफला मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्याची आवड होती. तो मोबाईलवर पब्जी गेम खेळायचा त्याआधी तो रील बनवून सोशल मीडियावर अपलोड करायचा. वडील फारूक यांनी सांगितले की, कैफला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. तो सतत मोबाईलवर हिच गेम खळायचा. तो रात्रभर मोबाईलवर पब्जी गेम खेळायचा. अनेक वेळा कुटुंबातील सदस्यांनी त्याला पब्जी गेम खेळू नको यासाठी ओरडा देखील दिला होता पण तरी देखाी त हे करण्यापासून मनाई केली पण तो ऐकत नव्हता.

PUBG Game: मध्यरात्री पब्जी गेम खेळताना डोक्यातील नस फाटली; तरुणाचा तडफडून मृत्यू
Shocking News: कारमध्ये आढळले १ महिला अन् २ पुरूषांचे मृतदेह, हत्या की आत्महत्या? दिल्लीत खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com