वृंदावन येथील संत प्रेमानंद महाराजांचे शिष्य दीपक लोधी उर्फ रसिक दुलारी यांच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दीपक यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यांच्या मृत्यूमागील प्राथमिक कारण समोर आल आहे. तसेच दीपक चौथ्या मजल्यावरून खाली पडताना CCTV व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागला आहे. दीपक यांच्या मृत्यूची चौकशी संदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोस्टमार्टम रिपोर्टबाबत माहिती देताना पोलिस अधिकारी संदीप कुमार यांनी संगितले की, प्राथमिक महितीनुसार दीपक यांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने झाला आहे. मात्र हा रक्तस्त्राव नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत तज्ञांकडून अधिक स्पष्टता होऊ शकते. असे पोलिसांना सांगितले.
दीपक चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांच्या शरीरावर अनेक गंभीर दुखापत झाल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
चौथ्या मजल्यावरून पडतानाचा CCTV समोर
दीपक बाराह घाट मार्गावरील गुरुकृपा कुंज आश्रमात राहत होते. याच आश्रमाच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. रविवारी पोलिसांच्या हाती या घटनेचा CCTV व्हिडीओ लागला. या व्हिडीओमध्ये आश्रमाच्या खालील रस्त्यावर काही नागरिक ये-जा करत असताना अचानक दीपक खाली पडताना दिसत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी दीपक यांच्या खोलीची तपासणी केली असता तिथे टाइल्स कापण्यासाठी वापरला जाणारा ग्राइंडर सापडल्याचं सीओ संदीप कुमार यांनी सांगितलं. पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक यांनी स्वतःला गंभीर इजा केल्यानंतर चौथ्या मजल्यावरून उडी घेतल्याचा संशय आहे.
मात्र, त्यांनी असं का केलं आणि या घटनेमागे नेमकं कारण काय होतं, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणातील सर्व शक्यता तपासल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.