मशिदीत नमाज पठणावेळी शक्तिशाली बॉम्बस्फोट; ३१ जणांचा मृत्यू, १६९ जखमी

Suicide Bombing During Friday Prayers In Islamabad: शिया मशिदीत नमाज पठणावेळी भीषण आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या दहशतवादी हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू तर 169 हून अधिक जखमी झाले आहेत. संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे.
Security personnel and rescue teams inspect the site after a deadly suicide bombing inside a Shia mosque in Islamabad.
Security personnel and rescue teams inspect the site after a deadly suicide bombing inside a Shia mosque in Islamabad.Saam Tv
Published On
Summary

इस्लामाबादमधील शिया मशिदीत भीषण आत्मघाती बॉम्बस्फोट

नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित

31 जणांचा मृत्यू, 169 हून अधिक जखमी

शहरात इमरजेंसी अलर्ट, परिसर सील करून तपास सुरू

पाकिस्तानच्या सुरक्षेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पुन्हा एकदा दहशतीने हादरली आहे. इस्लामाबादच्या तरलाई परिसरातील एका शिया मशिदीत भीषण आत्मघाती बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत किमान 31 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली असून 169 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

जुम्म्याच्या नमाजीनंतरच हा स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटाच्या वेळी मशिदीत मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात भीषण दृश्ये पाहायला मिळाली.

घटनेनंतर इस्लामाबादमध्ये तात्काळ इमरजेंसी अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिस, बचाव पथके, फॉरेन्सिक टीम तसेच पाकिस्तानची सेना घटनास्थळी दाखल झाली असून परिसर सील करून तपास सुरू करण्यात आला आहे. जखमींना शहरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून रुग्णालयांतही इमरजेंसी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त करत हा हल्ला मानवतेविरोधातील गुन्हा असल्याचे म्हटले आहे. तसेच जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली असून देशाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com