BJP Leader Killed: वाद मिटवण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्याची भरबाजारात हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Leader Killed : पनिहाटी येथील भाजपच्या वॉर्ड सचिव रुमा साहा यांचे पती, अरुप साहा यांचा एका हल्ल्यात मृत्यू झाला. पनिहाटीमधील सोदेपूर साइडिंग बाजार येथे सुरू असलेला वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला होता.
BJP ward secretary's husband Arup Saha dies after alleged attack in Panihati
BJP ward secretary's husband Arup Saha dies after alleged attack in Panihatisaam tv
Published On: 
Summary
  • भाजपच्या वॉर्ड सचिव रुमा साहा यांचे पती अरुप साहा यांचा मृत्यू

  • सोदेपूर साइडिंग बाजारात अरुप साहा यांच्यावर हल्ला झाला.

  • बाजारातील वाद मिटवताना अरुप साहा यांना मारहाण

पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पनिहाटी येथे धक्कादायक घटना घडलीय. पनिहाटी येथे भाजप नेत्यावर हल्ला झाला असून त्यात त्याचा मृत्यू झालाय. सोदेपूर साइडिंग बाजार परिसरात वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. यात भाजप नेते अरुप साहा यांचा मृत्यू झाला. ते पनिहाटी नगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १४ च्या भाजप सचिव रुमा साहा यांचे पती होते.

एका वादावर तोडगा काढण्यासाठी बाजारात आलेल्या अरूप साहा यांना मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना कामारहाटी येथील सागर दत्ता रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप रुमा साहा यांनी केलाय.

BJP ward secretary's husband Arup Saha dies after alleged attack in Panihati
NDAची ताकद वाढणार! भाजपचा जुना मित्रपक्ष पुन्हा करणार युती; राजकीय घडामोडींना वेग

वाद मिटवण्यासाठी आलेले जोडपे

मिळालेल्या माहितीनुसार, बाजारपेठेत काही तरुणांनी अश्लील भाषेचा वापर केल्यावर एका व्यावसायिकाने त्यास आक्षेप घेतला, ज्यातून वादाला सुरुवात झाली. या घटनेबाबत व्यावसायिकाने भाजपच्या वॉर्ड सचिव रुमा साहा यांच्याकडे तक्रार केली. वाद पुन्हा वाढल्यावर, रुमा त्यांचे पती अरूप साहा यांच्यासह घटनास्थळी पोहोचल्या. आरोपानुसार मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना अरूप यांना धक्का देण्यात आला, ज्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली.

BJP ward secretary's husband Arup Saha dies after alleged attack in Panihati
रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

आमदाराकडून जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित

या घटनेनंतर, आमदार रत्ना देबनाथ यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष चंडीचरण रॉय यांच्याबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.

तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले काही वॉर्ड-स्तरीय समन्वयक परिसरात अशांतता पसरवत आहेत. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.दरम्यान रुमा साहा यांनी प्रभाग क्र. १४ मधील राजदीप दास आणि सुजित कुमार विश्वास (उर्फ नानी) यांच्यासह अनेक व्यक्तींवर या घटनेत सहभागी असल्याचा आरोप केलाय. त्यांचा असा दावा आहे की, नानीनेच राजदीप आणि तृणमूल समर्थित इतर व्यक्तींना घटनास्थळी बोलावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.