NDAची ताकद वाढणार! भाजपचा जुना मित्रपक्ष पुन्हा करणार युती; राजकीय घडामोडींना वेग

Punjab Politics : पंजाब विधानसभा निवडणूक २०२७ आधी मोठी घडामोड घडलीय. भाजप आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा युती करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा सूत्रांचा दावा आहे.
NDA alliance strategy for Punjab Assembly elections 2027
NDA alliance strategy for Punjab Assembly elections 2027
Published On: 
Summary
  • भाजप आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा युती करण्याच्या तयारीत

  • दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची चर्चा सकारात्मक टप्प्यावर

  • नोव्हेंबर महिन्यात युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. विधानसभेवर सत्ता मिळवण्यासाठी एनडीएनं कंबर कसलीय. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा जुना मित्रपक्ष पुन्हा भाजपसोबत निवडणुकीत उतरणार आहे. पंजाबमधील २०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील युतीची शक्यता वाढलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमधील जागावाटपाबाबतची चर्चा सकारात्मक टप्प्यावर पोहोचलीय. सूत्रांच्या दाव्यानुसार, जागावाटपाबाबत सहमती झाली असून, नोव्हेंबर महिन्यात या युतीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

१७ नोव्हेंबर ही एक महत्त्वाची तारीख

पंजाब निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील १७ नोव्हेंबर २०२६ रोजी चंदीगडला पोहोचतील. या दौऱ्यादरम्यान ते राज्यातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेतील. दरम्यान युतीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातही लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे.

NDA alliance strategy for Punjab Assembly elections 2027
UP Election: INDIA आघाडीत धुसफूस? जागावाटपावरून काँग्रेसचा मित्रपक्ष नाराज? अखिलेश यादवांच्या विधानाने चर्चांना उधाण

सुमारे २४ वर्षे जुनी युती २०२० मध्ये तुटली

सप्टेंबर २०२० मध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ अकाली दलाने भाजपसोबतची आपली दीर्घकालीन युती तोडली होती. त्या काळात जागावाटपाच्या सूत्रानुसार, भाजप विधानसभेच्या २३ जागांवर निवडणूक लढवत असायची, तर अकाली दल ९४ जागांवर निवडणूक लढवत असायचे. मात्र आता छोट्या भावाची भूमिका स्वीकारण्याबाबत भाजपमध्ये मतभेद असल्याचे वृत्त आहे.

२ नोव्हेंबर रोजी सुखबीर बादल यांनी सांगितले की, युतीबाबतची स्थिती लवकरच स्पष्ट होईल. त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाव्यतिरिक्त इतर पक्षांसोबत युती करण्याच्या शक्यतांसाठी दरवाजे खुले ठेवलेत. भाजप नेते हरजित सिंग ग्रेवाल यांच्या मते, युतीबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व घेईल. पक्षातील काही नेते युतीचे समर्थन करत असले, तरी जुन्या कार्यकर्त्यांचा एक गट याला विरोध करत आहे.

NDA alliance strategy for Punjab Assembly elections 2027
रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही (RSS) सक्रिय

दरम्यान, पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाची (भाजप) संघटनात्मक तयारी अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही (RSS) आपला सहभाग वाढवलाय. १३ नोव्हेंबर रोजी चंदीगड येथे झालेल्या बैठकीत २०२७ च्या निवडणुकांसाठीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह अरुण कुमार यांनी भाजप नेत्यांना बूथ स्तरावर संघटना मजबूत करण्याचे आणि निवडणूक व्यवस्थापनावर विशेष भर देण्याचे आवाहन केलंय.

बैठकीदरम्यान, २०२२ च्या निवडणुकीतील अशा सुमारे ५,९०० मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती आखण्यात आलीय. तेथे भाजपला केवळ १ ते १०० मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. या बैठकीला सुनील जाखड, तरुण चुघ, सतीश पुनिया, विजय सांपला आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.