UP Election: INDIA आघाडीत धुसफूस? जागावाटपावरून काँग्रेसचा मित्रपक्ष नाराज? अखिलेश यादवांच्या विधानाने चर्चांना उधाण

Uttar Pradesh Elections: उत्तर प्रदेश निवडणुकीआधी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमधील जागावाटपाची चर्चा रंगली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले की, काँग्रेसने १८१ जागांची मागणी केलीय.
UP election seat-sharing dispute between Congress and SP
UP election seat-sharing dispute between Congress and SPsaam tv
Published On: 
Summary
  • काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील जागावाटपाच्या चर्चेला वेग

  • काँग्रेसने १८१ जागांची मागणी केल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला

  • १०० जागांची मागणी खूप कमी ठरेल, अशी टिप्पणी अखिलेश यादव यांनी केली.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. जागावाटपावावरून काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून करण्यात येणाऱ्या दाव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाबाबतची चर्चा जोरात सुरूय. काँग्रेसचे अनेक नेते २०० जागांची मागणी करू लागलेत.

निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरूय. यावरून दोन्ही पक्षांनी केलेल्या जागांच्या मागणीवरून सहमती होते की, बिघाडी होते यावरून तर्क-वितर्क सुरू झालेत. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाबाबत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक महत्त्वाचे विधान केलंय. 'एचटी लीडरशिप समिट'मध्ये अखिलेश यादव यांना जागावाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला. काँग्रेसने १०० जागांची मागणी केली आहे का? त्यावर उत्तर देताना अखिलेश यादव म्हणाले की, नाही काँग्रेसनं १८१ जागांची मागणी केलीय.

UP election seat-sharing dispute between Congress and SP
MP Resigns: मोदी सरकारमधील मंत्र्यानं खासदारकीचा दिला राजीनामा; काय आहे कारण?

उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राजेंद्र पाल गौतम यांनी म्हटले आहे की, आघाडीमध्ये 'मोठा' किंवा 'लहान' असा कोणताही भेदभाव नसतो. ज्याप्रमाणे कुटुंबात मालमत्तेची वाटणी समान केली जाते, त्याच तत्त्वाचा अवलंब आघाडीमध्येही केला जाईल. दरम्यान उत्तर प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष इम्रान मसूद यांनीही १८० ते २०० जागांची मागणी लावून धरलीय. मात्र अखिलेश यादव म्हणाले की, काँग्रेसकडून १८१ जागांची मागणी करण्यात आलीय.

UP election seat-sharing dispute between Congress and SP
Union Cabinet Expansion: काही मंत्र्यांना डच्चू, मित्रपक्षांना संधी? केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या बदलांचे संकेत, राजकीय घडामोडींना वेग

ज्यांच्यासोबत आघाडी त्यांच्यासोबत राहू -अखिलेश यादव

"ज्यांच्यासोबत आमची युती आहे, आम्ही त्यांच्यासोबतच राहू," असे अखिलेश यादव म्हणालेत. बीएसपी आणि एसपी एकत्र येण्याबाबतच्या प्रश्नावर भाष्य करताना अखिलेश म्हणाले की, समाजवादी पक्षाने अनेक युत्या केल्या आहेत. अनेक पक्षांना एकत्र आणले आहे आणि जे लोक अशाप्रकारे संबंध प्रस्थापित करतात, तेच पुढे जातात.

या बाबतीत समाजवादी पक्षाचा अनुभव अत्यंत सकारात्मक राहिलाय. याआधीही आमची बीएसपीसोबत युती होती. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या चळवळीच्याच मार्गावर चालत आहोत. काँग्रेससोबत आमची आघाडी आहे,ती तशीच राहणार. दरम्यान बसपा प्रमुख मायावती यांच्याबाबत अखिलेश यादव म्हणाले की,आम्ही एका आघाडीचे सदस्य आहोत, त्यामुळे इतर आघाड्यांचा विचार करत नाहीत.

भाजपचा पराभव करणे हा 'इंडिया' आघाडीचा उद्दिष्ट

'इंडिया' आघाडीचे एकमेव उद्दिष्ट भाजपचा पराभव करणे हे आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी नमूद केलं की, २०१४ मध्ये उत्तर प्रदेशने भाजप सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला होता, तर २०२४ मध्ये याच राज्यात भाजपचा पराभव झाल्यामुळे केंद्रात आघाडीचे सरकार स्थापन झाले.'बहुजन' समाजातील लोक 'पीडीए' (PDA) सोबत आहेत. भाजपने मागास वर्ग, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांची फसवणूक केली असून समाजात फूट पाडण्याचे काम केल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.