केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा खळबळजनक दावा
आप खासदार पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाण
आठवलेंनी इंडिया आघाडी कमकुवत होत असल्याचा दावा केला
उद्धव ठाकरे यांच्यावर आठवले यांनी टीका केली.
महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरेंचे ६ आमदार फुटल्यानंतर आणखी एक पक्ष गळाला लागण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उबाठा सेनेच्या पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान आता आम आदमी पक्षाचे (आप) लोकसभा खासदारही राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा देऊ शकतात, असा दावा केला आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता आप पक्ष फुटणार की एकत्र राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
ANI या वृत्त संस्थेशी बोलताना आठवले म्हणाले की, विरोधकांची इंडिया आघाडी आता कमकुवत होत चालली आहे. “एक अतिशय चांगली गोष्ट घडली आहे. द्रमुकने काँग्रेससोबतची आघाडी तोडली आहे. तसेच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील अनेक खासदार आमच्या संपर्कात आहेत. आम आदमी पक्षाचे काही लोकसभा सदस्यही लवकरच एनडीएसोबत येऊ शकतात,” असा दावा त्यांनी केला.
तसेच महाराष्ट्रातील गटफुटी प्रकरणावर बोलताना आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय ठाकरे यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या नुकसानकारक ठरल्याचे त्यांनी म्हटले. “त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला असता, तर ते स्वतः उपमुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र चुकीच्या निर्णयामुळे आज त्यांना आमदार आणि खासदार एकत्र ठेवणे कठीण जात आहे,” असे आठवले म्हणाले.
शिवसेनेतील फुटीचा संदर्भ देताना त्यांनी दावा केला की, ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेत गेले. त्यामुळे राज्यात महायुती आणि एनडीएची ताकद अधिक वाढल्याचे त्यांनी सांगितले. या दाव्यांमुळे आगामी काळात राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.