Political News: मोठी बातमी! आणखी एका राजकीय पक्षाला मोठं खिंडार, १०० नेत्यांनी सोडली साथ

Mamata Banerjee Faces Major Setback: पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. तृणमूल काँग्रेसच्या १०० नेत्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Political News: मोठी बातमी! आणखी एका राजकीय पक्षाला मोठं खिंडार, १०० नेत्यांनी सोडली साथ
Mamata Banerjee Faces Major SetbackSaam Tv
Published On: 
  • पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड

  • ममता बॅनर्जी यांना बसला मोठा झटका

  • १०० नेत्यांनी सोडली पक्षाची साथ

  • टीएमसीच्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना काँग्रेसने मोठा धक्का दिला. तृणमूल काँग्रेसच्या १०० हून अधिक नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडली. या सर्वांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन प्रमुख जागांवर पोटनिवडणुका होणार आहे. या निवडणुकीआधीच ही सर्वात मोठी फूट पडली आहे. आधीच आमदारांच्या फुटीमुळे बॅनर्जी यांच्या गटाने पक्षाचे मूळ नाव आणि निवडणूक चिन्ह आधीच गमावले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने टीएमसीचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवले आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.

Political News: मोठी बातमी! आणखी एका राजकीय पक्षाला मोठं खिंडार, १०० नेत्यांनी सोडली साथ
ममता बॅनर्जी पुन्हा संतापल्या! थेट TMC कार्यकर्त्याला कानशिलात लगावली; व्हिडिओ व्हायरल होताच राजकारण तापलं

रविवारी मालदा येथील महिश बाथानी परिसरात तृणमूल काँग्रेसच्या अनेक सदस्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये १३ पंचायत सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, पक्षाचे प्रादेशिक अध्यक्ष, ब्लॉक उपाध्यक्ष आणि १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे बलरामपूर येथे एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिथे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, राज्य काँग्रेस उपाध्यक्ष आणि माजी आमदार बी. हाल्डर हे देखील उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का मानला जात आहे. पोटनिवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची ताकद वाढली.

Political News: मोठी बातमी! आणखी एका राजकीय पक्षाला मोठं खिंडार, १०० नेत्यांनी सोडली साथ
Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

ज्या महेश बाथानी मतदारसंघात ही फूट पडली तो पूर्वी काँग्रेसचा प्रमुख बालेकिल्ला मानला जात होता. पण ममता बॅनर्जीच्या राजकीय उदयानंतर या मतदारसंघातील परिस्थिती बदलली होती. आता असे म्हटले जात आहे की, या पक्षांतरामुळे काँग्रेसने आपले जुने स्थान पुन्हा मिळवले आहे. भारतीय जनता पक्षाने टीएमसीचा पराभव करून राज्यात पहिल्यांदाच सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर ममता बॅनर्जींच्या आमदारांनी देखील त्यांची साथ सोडली. आता त्यांना आणखी धक्के बसत चालले आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील दोन प्रमुख जागांसाठी ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. ६ ऑक्टोबर रोजी मतदान तर ९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्यानंतर नंदीग्रामची जागा रिक्त झाली होती तर आम जनता उन्नयन पक्षाचे हुमायून कबीर यांनी नौडा जागा कायम राखली त्यामुळे राजनगरची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या दोन जागांसाठी मतदान होत आहे. आता हुमायून कबीर यांचा मुलगा राजनगर इथून निवडणूक लढवत आहे. ममता बॅनर्जी गटाने रबीउल आलम चौधरी यांना तिकीट दिले आहे.

Political News: मोठी बातमी! आणखी एका राजकीय पक्षाला मोठं खिंडार, १०० नेत्यांनी सोडली साथ
TMC नाव आणि चिन्हाच्या वादावर मोठी अपडेट; शिवसेना पक्ष-चिन्ह वादाचाही सुप्रीम कोर्टाकडून उल्लेख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com