मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी;10 आमदार देणार AIADMK पक्षाचा राजीनामा; राजकारणात मोठी खळबळ

TVK Operation L : मुख्यमंत्री विजय केवळ मित्रपक्षांवरील आपले अवलंबित्व कमी करणार नाहीत, तर विरोधी पक्षाची तळागाळातील भक्कम निवडणूक यंत्रणाही आपल्या नव्याने स्थापन झालेल्या पक्षात सामावून घेतील.
TVK Operation L
AIADMK MLAs likely to join TVK before August 15saam tv
Published On
Summary
  • तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू आहे.

  • AIADMK मधील सुमारे १० आमदार TVK मध्ये जाण्याची शक्यता

  • मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK पक्षाचे संख्याबळ वाढण्याची शक्यता

महाराष्ट्रातील राजकारणात ज्याप्रमाणे मोठी घडामोडी होताना दिसत आहेत. त्याच दक्षिणेतील एका राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आम्ही चर्चा करत आहोत, तमिळनाडूमधील राजकीय स्थितीची. तेथील मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) हा पक्ष आता बहुमताच्या जवळ पोहोचू लागलाय. त्यामुळे राज्यातील सराकर अजून मजबूत होणार आहे.

TVK Operation L
नेपाळमध्ये पुन्हा तरुणांच्या आंदोलनाचा भडका! शाहांच्या राजीनाम्याची मागणी

हाती आलेल्या वृत्तानुसार मुख्य विरोधी पक्ष असलेल्या 'एआयएडीएमके'मधील (AIADMK) आणखी सुमारे १० आमदार १५ ऑगस्टपूर्वी विधानसभेचा राजीनामा देत अधिकृतपणे सत्ताधारी 'टीव्हीके' (TVK) पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. विजय यांच्या पक्षात या योजनेला 'ऑपरेशन एल' (Operation L) असे नाव देण्यात आले आहे.

TVK Operation L
Congress: दक्षिणेतील राजकारण तापलं! AIADMK नंतर काँग्रेसमध्येही धूसफूस, बड्या महिला नेत्याचा राजीनामा

सूत्रांच्या माहितीनुसार 'ऑपरेशन एल'चा पूर्ण प्लॅन तयार करण्यात आलाय. त्यापार्श्वभूमीवर आमदारांच्या राजीनाम्यांची वेळ अत्यंत विचारपूर्वक निश्चित करण्यात आली. निवडणूक आयोग लवकरच विधानसभेच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील चर्चेत सहभागी असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर 'द इंडियन एक्सप्रेस' या वृत्तसंस्थेला सांगितले की, "राजीनामे आणि पक्षबदलाची ही संपूर्ण प्रक्रिया स्वातंत्र्यदिनापूर्वी पूर्ण केली जाईल. यामागील उद्देश म्हणजे निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ही राजकीय उलथापालथ सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com