Sex Racket : स्पा सेंटरावर पोलिसांची धाड, ६ परदेशी महिलांना नको त्या अवस्थेत पकडलं; मालक पळून गेला

Punjab Sex Racket Bust : पंजाबमध्ये स्पा सेंटरावर पोलिसांनी छापा टाकत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. कारवाईत सहा परदेशी महिला आणि एका व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले असून दोन संचालक फरार आहेत.
PUNJAB KHANNA SPA RAID: SIX FOREIGN WOMEN DETAINED, TWO OPERATORS ABSCONDING
PUNJAB KHANNA SPA RAID: SIX FOREIGN WOMEN DETAINED, TWO OPERATORS ABSCONDING Saam Tv
Published On
Summary
  • पंजाबमधील खन्ना सिटी सेंटरमधील स्पा सेंटरांवर पोलिसांची छापेमारी

  • कारवाईत सहा परदेशी महिला आणि एका व्यवस्थापकाला अटक

  • दोन स्पा सेंटरचे संचालक फरार

  • स्पा सेंटरांच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती

पंजाबमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जीटी रोडवरील खन्ना सिटी सेंटरमध्ये सुरू असलेल्या स्पा सेंटरांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईदरम्यान देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आता. या कारवाईदरम्यान सहा परदेशी महिलांना आणि एका व्यवस्थापकाला ताब्यात घेतले असून, दोन स्पा सेंटरचे संचालक घटनास्थळावरून फरार झाले आहेत. फरार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खन्ना सिटी सेंटरमधील काही स्पा सेंटरांच्या नावाखाली नको ते धंदे सुरू असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मिळत होत्या. या माहितीची खात्री करण्यासाठी सिटी-2 पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून छापेमारी केली. या कारवाईदरम्यान तीन वेगवेगळ्या स्पा सेंटरांची तपासणी करण्यात आली.

PUNJAB KHANNA SPA RAID: SIX FOREIGN WOMEN DETAINED, TWO OPERATORS ABSCONDING
Women Purse : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

छापेमारीत सहा परदेशी महिलांना आणि एका व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात या महिलांकडून देह विक्री करवून घेतली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात संबंधितांवर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान एका स्पा सेंटरचा संचालक हरियाणातील अंबाला येथील रहिवासी कप्तान सिंह असल्याचे समोर आले आहे.

PUNJAB KHANNA SPA RAID: SIX FOREIGN WOMEN DETAINED, TWO OPERATORS ABSCONDING
Ladki Bahin Yojana : खात्यात 1500 येईना, लाडकींचे टेन्शन वाढले; मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

दुसरा संचालक मनोज हा पोलिसांच्या कारवाईपूर्वीच पसार झाला. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी-2 पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक तरविंदर कुमार बेदी यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या महिलांची चौकशी सुरू असून सखोल तपास केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com