

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आसामच्या डिब्रूगढ जिल्ह्यातील एका चहाच्या बागेला भेट दिली. यावेळी त्यांनी बागेत काम करणाऱ्या महिलांशी संवादही साधला. आसामच्या विधानसभा निवडणूकीपूर्वी पंतप्रधानांनी केलेल्या या दौऱ्याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी पंतप्रधान मोदींनी चहाला आसामचा आत्मा म्हटलंय.
पंतप्रधान मोदींनी चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिला कामगारांसोबत सेल्फीही काढला. पंतप्रधान मोदींनी या दौऱ्याचे फोटो एक्लवर शेअर केलेत. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवारांच्या समर्थनार्थ दोन निवडणूक सभांना संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी एका दिवसाच्या आसाम दौऱ्यावर आहेत.
मनोहर टी इस्टेटचा दौरा केल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर म्हटलंय की, "प्रत्येक चहा उत्पादक आदिवासी कुटुंबाच्या प्रयत्नांचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने आसामला गौरव प्राप्त झाला आहे." यावेळी पंतप्रधान मोदी महिलांसोबत चहाची पानंही खुडतानाही दिसले.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत म्हटलंय, ही दिब्रुगढमधील चहाच्या मळ्याची झलक आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय की, 'चहाची पानं खुडल्यानंतर महिलांनी त्यांच्या संस्कृतीबद्दल चर्चा केली आणि शेवटी एक सेल्फीसुद्धा काढला'
पंतप्रधान म्हणाले, 'आपल्या मुलींची कोणीही फसवणूक करू नये आणि त्यांच्या सन्मानाचं आणि जीवनाचं रक्षण व्हावं, यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आसाममध्ये समान नागरी संहितेची (UCC) अंमलबजावणी करणं, आपल्या आदिवासी समाजाच्या परंपरांचं रक्षण करणं, सहाव्या अनुसूचीतील क्षेत्राचं संरक्षण करणे किंवा आसामची ओळख जतन करणं, या मोठ्या घोषणा आहेत. भाजप जे बोलतो ते करून दाखवतो."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.