पाकिस्तानला हादरवणारी बातमी ! दिवस, वेळ अन् टार्गेट ठरवा...; PM मोदींनी दिला सैन्याला ग्रीन सिग्नल, युद्ध अटळ?

Pahalgam Terrorist Attack : दिवस, वेळ अन् टार्गेट निवडावे आणि कारवाई करावी अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ल्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, असंही पंतप्रधानांनी सैन्याच्या तीनही दलांना सांगितलं आहे.
PM Narendra modi instruction to all three armed forces to take revange
PM Narendra modi instruction to all three armed forces to take revangeSaam Tv News
Published On

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली आहे. त्यातच आत्ता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडत आहे. याचदरम्यान, अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, सैन्यदलाच्या क्षमतेवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्यांनी दिवस, वेळ अन् टार्गेट निवडावे आणि कारवाई करावी अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ल्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर द्या असंही पंतप्रधानांनी सैन्याच्या तीनही दलांना सांगितलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सातत्याने वरिष्ठ पातळीवरच्या बैठका घडताना दिसत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पंतप्रधान मोदींची भेट घेताना दिसत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पाकिस्तानात तीन दिवसांसाठी हवाई क्षेत्रावर देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाकिस्तान सैन्याने सीमेवर रणगाडे देखील आणले आहेत. पाकिस्तानात सुरु असलेल्या या हालचालींकडे भारतीय सैन्याचं अतिशय बारकाईनं लक्ष आहे. भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर चोख तयारी करण्यात आली आहे.

PM Narendra modi instruction to all three armed forces to take revange
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मोठी घडामोड, तीनही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत बैठक; काहीतरी मोठं घडणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आगामी काळात चार महत्त्वाच्या बैठकी होणार आहेत. भारताच्या सुरक्षेसंबंधित या महत्त्वाच्या बैठका असणार आहेत. यापैकी उद्या सकाळी ११ वाजता होणारी बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे. कॅबिनेट कमिटी ऑफ सेक्युरिटी म्हणजेच सीसीएसची बैठक उद्या सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षेसंबंधित निर्णय घेण्याबाबत ही अत्यंत उच्चस्तरीय समिती आहे. या समितीची उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याआधी पंतप्रधान मोदींनी तीनही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक बोलावण्यात आली होती.

PM Narendra modi instruction to all three armed forces to take revange
Pahalgam terror attack : PM नरेंद्र मोदी संकटकाळी बेपत्ता; पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेसचा टोला; भाजपनेही दिलं सडेतोड प्रत्युत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com