Cabinet Reshuffle : मोदी कॅबिनेटमध्ये २ नव्या मंत्र्यांची एंट्री निश्चित? मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच 'या' नावांची चर्चा

Modi Cabinet Reshuffle 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. दोन नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून संभाव्य नावांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Modi cabinet reshuffle latest news
Modi cabinet reshuffle latest newsSaam TV
Published On

Modi cabinet reshuffle latest news : केंद्र सरकारच्या विस्ताराबाबत राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि फेरबदलाच्या (Cabinet Reshuffle) चर्चांनी यामुळे जोर धरला आहे. भाजप संघटन पातळीवर नव्या घडामोडी घडत असतानाच, मोदी कॅबिनेटमध्ये २ नव्या चेहऱ्यांची एंट्री जवळजवळ निश्चित मानली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी कोणत्या नेत्यांची नावे आघाडीवर आहेत आणि या संभाव्य फेरबदलामागे कोणती राजकीय समीकरणे आहेत, याबद्दल आता उत्सुकता ताणली गेली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही; तरीही नवीन मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांचा समावेश केला जाईल, याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, आतापर्यंत सत्ताधारी आघाडीतील कोणत्याही पक्षाने यावर काहीही भाष्य केलेले नाही.

Modi cabinet reshuffle latest news
Housing Society : सोसायटीने गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी सक्ती केली? आताच जाणून घ्या तुमचे कायदेशीर अधिकार

काही दिवसांपूर्वीच मंत्रिपदामध्ये काही फेरबदल करण्यात आले. यातील सर्वात नवीन बदल शिक्षणमंत्र्यांच्या पदाबाबतचा आहे. दिल्लीतील आंदोलनांनंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या पदावर प्रल्हाद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. त्याशिवाय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनीही राजीनामा दिला आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. आगामी पंजाब विधानसभा निवडणुका लक्षात घेता, पक्ष बिट्टू यांच्याकडे निवडणुकीशी संबंधित एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, पक्षाकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Modi cabinet reshuffle latest news
मध्य रेल्वेवर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा ब्लॉक, अनेक लोकल अन् एक्सप्रेसच्या वेळेत बदल, पाहा A टू Z माहिती

आणखी दोन मंत्र्यांचा कार्यकाळ संपणार

जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग बिट्टू यांचा कार्यकाळ संपला आहे. त्याशिवाय आणखी दोन मंत्र्यांचा कार्यकाळ काही दिवसांत संपणार आहे. त्यामध्ये हरदीप सिंग पूरी आणि बी. एल. वर्मा यांचा समावेश आहे. या दोन्ही मंत्र्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. राज्यसभेवर त्यांच्या पुनर्नियुक्तीबाबत पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची पक्षाच्या राष्ट्रीय खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार स्थापन होण्यापूर्वीही ते याच पदावर कार्यरत होते.

Modi cabinet reshuffle latest news
मोठी बातमी! काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, आमदारासह एसीपी, डीसीपी घटनास्थळावर, राज्यात खळबळ

कोणाची एंट्री होणार?

मंत्रिमंडळ विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये कोणत्या नेत्यांचा समावेश होईल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने जूनमध्ये नव्या मंत्र्यांच्या समावेशाबाबत वृत्त दिले होते. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने, मोदींच्या मंत्रिमंडळात या तीन राज्यांतील अधिक प्रतिनिधींचा समावेश होण्याची शक्यता आहे.

सरकारमधून हटवण्यात आलेल्या काही मंत्र्यांना राज्यपालपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर या नावाची महाराष्ट्रातून चर्चा आहे. त्याशिवाय राघव चढ्ढा यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. टीएमसीमधून फुटून मोदी सरकारल पाठिंबा देणाऱ्या गटालाही सरकारमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com