PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींवर आत्मघातकी हल्ल्याचा कट; गुप्तचर यंत्रणांनी दिला इशारा

दिवाळीपूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे.
Pm Narendra Modi
Pm Narendra ModiSaam Tv
Published On

PM Narendra Modi News : दिवाळीपूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या सुरक्षेबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. मोदींवर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या कागदपत्रांवरून समोर आले आहे. (PM Narendra Modi Latest News)

Pm Narendra Modi
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, अजित पवार नाव आलं की...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दहशतवादी (Terrorist Attack) रॅली किंवा रोड शोमध्येही एन्ट्री घेऊ शकतात. असं गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात आलंय. दहशतवादी पोलिसांच्या गणवेशातही पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी आत्मघाती हल्ला करू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर काही दहशतवादी लष्कर तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संपर्कातही असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना मोदींवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा, इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने लष्करला भारतातील सर्व बड्या नेत्यांना आपल्या निशाण्यावर घेण्याचे आदेश दिले आहेत.

यामध्ये सर्वात मोठे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आहे. पोलिसांच्या गणवेशातील हे दहशतवादी पीएम मोदींवर आत्मघाती हल्ला करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुप्तचर संस्थेने लष्कर-ए-तैयबाचे संभाषण रेकॉर्ड केले आहे, त्यानंतरच ही माहिती समोर आली आहे. या अलर्टनंतर पंतप्रधान मोदींची सुरक्षा वाढू शकते असे मानले जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com