राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, अजित पवार नाव आलं की...

सरकार येऊन शंभर दिवस झाले तरिही लोकप्रतिनिधींना कसे वागायचे बोलायचे काही कळत नाही - पवार
Ajit PawarNews
Ajit PawarNewsSaam TV
Published On

रश्मी पुराणिक -

मुंबई: विरोधी पक्षेनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक विषयांवरती भाष्य केलं. राज्यातील अवकाळी पाऊस, राज्य शासनाचे अनेक निर्यणायवरती भाष्य करतानाच राज्य सहकारी बँक घोटाळा चौकशी प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली, मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार असून यापुर्वीही अनेक वेळा चौकशी झाल्याचं पवार यावेळी सांगितलं. (State Cooperative Bank Scam)

पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, पावसामुळे यंदा राज्यातील शेतकऱ्यांची पिकं वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. आता पुन्हा परतीच्या पवसाने (Rain) धूमाकुळ घातला असून चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. आता पुन्हा दिवाळी तोंडावर चक्रीवादळ संकट आहे. लोकांना अलर्ट केले पाहीजे. धरणातून पाणी सोडत असताना नदी काठच्या गावांना धोका व्हायला नको यासाठी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

मान्सूनने निरोप घेतला हे हवामान खात्याने सांगितल्यानंतरही पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यांच्या खात्यावर मागच्या नुकसानीचे पैसे अडून आले नसून याबाबत कोणीच काही बोलत नसल्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय आवस्था झाली आहे.

पाहा व्हिडीओ -

शिवाय पुण्यात (Pune) इतका पाऊस झाला आहे की, रस्त्यांना नद्यांचे सरूप आले आहे. वाहतूकीला अडचण होत आहे याकडे कोणी पाहायला तयार नाही. पुणेकरांना त्रास होणार नाही हे पाहून काम करायला पाहिजेत. शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, ज्या प्रकारे लक्ष दिले पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही. रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याचंही पवार म्हणाले.

१०० रुपयात दिवाळी गोड कधी होणार ?

दिवाळीच्या मुहूर्तावर १०० रुपयात दिवाळी गोड करणार अशी घोषणा सरकारने केली त्यानुसार रवा, चना डाळ, खाद्य तेल देणार असल्याचं सांगितल. मात्र, एकानं कंत्राट दिलं, दिवाळी जवळ आली तरिही शंभर रुपयात शिधा लोकांपर्यंत पोहचला नाही. पारदर्शकपणे हे साहित्य मिळालं पाहिजे, यामध्ये काही तरी गडबड असल्याची चर्चा सुरु असल्याचं पवार म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांनी यावेळी गिरिष महाजन (Girish Mahajan) व्हायरल क्लिपवरुन देखील सरकारला सुनावलं, सरकार येऊन शंभर दिवस झाले तरिही लोकप्रतिनिधींना कसे वागायचे बोलायचे काही कळत नाही. कानाखाली आवाज काढू ही भाषा? हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? मंत्र्यांच्या अर्वाच्य भाषेतील क्लिप आल्या आहेत. त्यांचा आवाज की दुसऱ्यांचा? आवाज मंत्र्यांचा असेल, तर ही भाषा? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Ajit PawarNews
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला फोडण्याचा विरोधकांचा डाव; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

शाळा बंद करण्याचा निर्णय दुर्देवी -

शिवाय सरकारने पंधरा हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण अडचणीत आली असून याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. आझाद मैदानावर शिक्षक आंदोलन करत आहेत मात्र, दुर्दैवाने राज्यकर्त्यांना तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी खंत देखील पवार यांनी व्यक्त केली.

तर अंधेरी पोटनिवडणूकीत (Andheri by-election) भाजपने उमेदवार मागे घेतली, पवारसाहेब आणि राज ठाकरेंनी आवाहन केलं भाजपने सकारात्मक भूमिका घेतली त्यांचे कौतुक करतो, असे पायंडे पडले तर चांगले आहे अशा शब्दात अजित पवारांनी भाजपच्या निर्णयाचं स्वागत केलं. दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं असून त्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत जे नुकसान झालं आहे त्या विभागाना आदेश देऊन मदत करावी. सरकर येते जाते मात्र, प्रत्येक नागरिकाचे संरक्षण करने ही सरकारची जबाबदारी असते.

चौकशीला सामोरं जायला तयार - पवार

यावेळी अजित पवारांनी राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या चौकशीबाबत देखील वक्तव्य केलं. पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, हे किती वेळा झालं? २०१२ ला झालं प्रत्येक वेळी अजित पवार नाव आलं की हेडलाईन्स होतात. माझं मत आहे काय चौकशी करावी हा त्यांचा निर्णय आहे, सरकार त्यांचे आहे. मागे सहकार विभागाने चौकशी केली, CID, ED ने चौकशी केली तरी आता पुन्हा चौकशीची बातमी आली आहे.

मी संविधान कायदा मानतो चौकशी करताना मला प्रश्न विचारले मी उत्तर द्यायची तयारी केली आहे. शिवाय आपण चौकशीला सहकार्य करणार असून तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला उत्तर देऊ, ACB ने क्लिनचीट दिली होती. जनता शहाणी आहे ते पाहत आहेत. मला कोणावर आरोप करायचे नाहीत असं म्हणत त्यांनी राज्य सहकारी बँक प्रकरणावरती उत्तर दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com