Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ३ प्रवाशांचा मृत्यू; १५ जण गंभीर जखमी

Himachal Pradesh Bus Accident: हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेली प्रवासी बस दरीत कोसळली. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की बसचा चुराडा झाला.
Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ३ प्रवाशांचा मृत्यू; १५ जण गंभीर जखमी
Himachal Pradesh Bus AccidenSaam tv
Published On

Summary -

  • हिमाचल प्रदेशात प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

  • या अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले

  • ट्रकला साइड देताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली

  • पोलिस आणि एनडीआरएफने तातडीने बचावकार्य केले

हिमाचल प्रदेशातील देहराडूनमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. मंगळवारी सकाळी प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली. या अपघातामध्ये ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर १५ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. हिमाचल प्रदेशच्या चौपाल-नेरवावरून पांवटाला ही बस निघाली होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली.

या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर १५ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तातडीने बचाव कार्य करत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. हा अपघात इतका भीषण होता की बसचा चक्काचूर झाला आहे. दरीतून जखमींना बाहेर काढणं देखील कठीण झाले होते.

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ३ प्रवाशांचा मृत्यू; १५ जण गंभीर जखमी
Accident News : समृद्धीवर भयंकर अपघात, ठाण्याहून नागपूरला जाताना काळाचा घाला, मायलेकाचा जागीच मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता नेहवाला आली. त्यानंतर ही बस मीनस-क्वानू- हरिपूर मार्गे पावटाला जात होती. या बसमध्ये ३० पेक्षा अधिक प्रवासी होती. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. मीनस-क्वानू-हरिपूर मार्गावर सुदोईजवळ ही बस दरीत कोसळली. ट्रकला साइट देण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली.

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ३ प्रवाशांचा मृत्यू; १५ जण गंभीर जखमी
Accident News : महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला कंटेनरची जोरदार धडक; लोखंडी रॉड बसच्या आरपार घुसला अन्...

अपघाताचे वृत्त कळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस, एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहचली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करत अनेकांचे प्राण वाचवले. गंभीर जखमी झालेल्या १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ३ प्रवाशांचा मृत्यू; १५ जण गंभीर जखमी
Accident : कारची दुचाकीला जोरात धडक, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा जागेवरच मृत्यू, शिवसेनेवर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com