Papua New Guinea Landslide: पापुआ न्यू गिनीआमध्ये मृत्यूतांडव! संपूर्ण गाव उद्ध्वस्त..., भूस्खलनामुळे 670 जण ढिगाऱ्याखाली जिवंत गाडले गेले

Papua New Guinea Landslide Update: इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने पापुआ न्यू गिनीआमध्ये भूस्खलनामुळे मातीखाली दबलेल्या लोकांची संख्या 670 वर गेली असल्याचे सांगितले. उत्तर-पश्चिम भागातील एंगा प्रांतामध्ये असलेल्या काओकलाम गावामध्ये आज पहाटे ३ च्या सुमारास भुस्खलन झाले.
पापुआ न्यू गिनीआमध्ये मृत्यूतांडव! संपूर्ण गाव उद्ध्वस्त..., भूस्खलनामुळे 670 जण ढिगाऱ्याखाली जिवंत गाडले गेले
Papua New Guinea Landslide UpdateSaam Tv
Published On

पापुआ न्यू गिनीआ भूस्खलनाच्या (Papua New Guinea Landslide) घटनेमुळे हादरले आहे. पापुआ न्यू गिनीआमध्ये झालेल्या भूस्खलनाबाबत संयुक्त राष्ट्राने मोठे वक्तव्य केले आहे. या भूस्खलनामध्ये ६७० पेक्षा जास्त जण मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत गाडले गेलेत. पापुआ न्यू गिनीआची राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून जवळपास ६०० किलोमीटर उत्तर-पश्चिम भागातील एंगा प्रांतामध्ये असलेल्या काओकलाम गावामध्ये आज पहाटे ३ च्या सुमारास भुस्खलन झाले.

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने पापुआ न्यू गिनीआमध्ये भूस्खलनामुळे मातीखाली दबलेल्या लोकांची संख्या 670 वर गेली असल्याचे सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या माइग्रेशन एजन्सीचे प्रमुख सेरहन अक्टोप्राक यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या भूस्खलनात 150 हून अधिक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यांबाली गाव आणि एन्गा प्रांतातील अधिकाऱ्यांनी केलेल्या मूल्यांकनावर मृतांची संख्या आधारित आहे. 670 हून अधिक जण मातीखाली गाडले गेल्याचा अंदाज आहे.

यूएन मायग्रेशन एजन्सीचे अधिकारी सेरहन ऑक्टोप्राक यांनी रविवारी एएफपीला सांगितले की, 150 हून अधिक जण विस्थापित झाल्याचे मानले जात आहे. आतापर्यंत 670 हून अधिक जण मातीखाली गाडली गेली आहेत. पोर्ट मोरेस्बी येथे राहणारे अक्टोप्राक यांनी एएफपीला सांगितले की, घटनास्थळावरील परिस्थिती गंभीर आहे कारण जमिनीवर अजूनही मातीची घसरण होत आहे. पाणी वाहत असून तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना धोका आहे.

पापुआ न्यू गिनीआमध्ये मृत्यूतांडव! संपूर्ण गाव उद्ध्वस्त..., भूस्खलनामुळे 670 जण ढिगाऱ्याखाली जिवंत गाडले गेले
Rajkot Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोनच्या मालकासह तिघांना अटक, आग भडकण्यामागचं कारणही आलं समोर

स्थानिक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मृतांची संख्या 100 किंवा त्याहून अधिक असल्याचे सांगितले होते. रविवारपर्यंत फक्त पाच जणांचे मृतदेह आणि एका व्यक्तीचा पाय सापडला. ऍक्टोप्राकने पुढे सांगितले की, 20 ते 26 फूट ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या नागरिकांची वाचण्याची शक्यता कमी आहे. घटनास्थळावर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक प्रशासनाला मदत करत आहेत. आपली व्यक्ती जिवंत बाहेर येईल या आशेने प्रत्येकजण त्याठिकाणी वाट पाहत बसले आहेत. नुकसान झालेल्या गावातून 1,000 हून अधिक लोकं विस्थापित झाले आहेत. भूस्खलनामुळे पाणीपुरवठा जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

पापुआ न्यू गिनीआमध्ये मृत्यूतांडव! संपूर्ण गाव उद्ध्वस्त..., भूस्खलनामुळे 670 जण ढिगाऱ्याखाली जिवंत गाडले गेले
Remal Cyclone: रेमल चक्रीवादळचं थैमान; IMD कडून रेड अलर्ट, एअर इंडियाने रद्द केली ३००हून अधिक उड्डाणे

मानवतावादी एजन्सी केअर इंटरनॅशनलचे कंट्रीचे संचालक जस्टिन मॅकमोहन यांनी सांगितले की, निर्वासितांना अन्न, पाणी आणि निवारा प्रदान करणे तसेच त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थिर जमिनीवर हलवणे याला जास्त प्राधान्य आहे. दरम्यान, भूस्खलन झालेल्या गावातील नागरिकांसाठी जेवण, पाणी आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर आदिवासींनी हल्ला केला. आता पापुआ न्यू गिनीआचे सैनिक काफिल्यांना सुरक्षा देत आहेत. भूस्खलनाच्या दीर्घकाळ चाललेल्या वादातून शनिवारी दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये झालेल्या हाणामारीत आठ स्थानिकांचा मृत्यू झाला. प्रतिस्पर्धी गटामध्ये झालेल्या स्थानिक वादामध्ये 30 घरे जळाली आहेत.

पापुआ न्यू गिनीआमध्ये मृत्यूतांडव! संपूर्ण गाव उद्ध्वस्त..., भूस्खलनामुळे 670 जण ढिगाऱ्याखाली जिवंत गाडले गेले
Delhi Hospital Fire: बेबी केअर सेंटरचा मालक नवीनला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com