

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वाद उफाळून आला असतानाच, बिहारच्या पूर्णियातील खासदार पप्पू यादव यांनी महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. नेत्यांच्या बेडरूममध्ये गेल्याशिवाय ९० टक्के महिला नेत्या राजकारण करूच शकत नाहीत, असं पप्पू यादव म्हणाले. त्यांच्या या विधानामुळं संताप व्यक्त करण्यात येत असून, राजकारण तापले आहे.
बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव (pappu yadav political controversy women statement) यांनी राजकारणातील महिलांची भूमिका आणि त्यांच्या वर्तवणुकीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. देशातील राजकारणात महिलांना तडजोड केल्याशिवाय पुढे जाणं अशक्य करून ठेवलं आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही गांभीर्याने घेतला जात नाही, असं पप्पू यादव म्हणाले. समाजात महिलांना देवीचा दर्जा दिला असला तरी, वास्तवात याच्या उलट परिस्थिती आहे, असंही ते म्हणाले.
पप्पू यादव यांच्या विधानानंतर मोठा वाद उफाळून आला आहे. बिहार राज्य महिला आयोगानं त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्यात यावे, असे आयोगाने म्हटले आहे.
पप्पू यादव यांनी घरापासून ऑफिसपर्यंत महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या मुद्द्यावर भाष्य केले. महिलांचे शोषण करण्यात राजकीय नेते सर्वात आघाडीवर आहेत. अमेरिकेपासून भारतापर्यंत नेते मंडळींची महिलांवर वक्रदृष्टी असते, असे ते म्हणाले. नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारण करू शकत नाहीत. देशात एक चुकीची संस्कृती फोफावली आहे. शाळा, कॉलेज, ऑफिस अशा सर्व ठिकाणी मुली-महिलांचे शोषण होत आहे. कौटुंबिक हिंसेच्या माध्यमातूनही त्यांचे शोषण केले जात आहे, याकडे पप्पू यादव यांनी लक्ष वेधले.
पप्पू यादव यांच्या वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. यादव यांचे वक्तव्य घृणास्पद असल्याचे आयोगाने म्हटले. महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांनी यादव यांना नोटीस बजावली आहे. पप्पू यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसून आले. नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारण करू शकत नाहीत, असे पप्पू यादव म्हणाले. त्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली. त्यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. तुम्ही असे वक्तव्य का केले आणि तुमची खासदारकी रद्द करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे शिफारस का करू नये? अशी विचारणा आयोगाने पप्पू यादव यांना केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.