Seema haider : सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या; पहिल्या नवऱ्याची ४ मुलं पाकिस्तानला जाणार? कारण काय?

seema haider Latest Update : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या आहेत. पाकिस्तानातील राष्ट्रीय बाल आयोगाने सीमा हैदरचे ४ मुले पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे.
सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या; ४ मुलं पाकिस्तानला जाणार?  कारण काय?
Seema Haider News UpdateSaam Tv
Published On

नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने परराष्ट्र मंत्रालायाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात सीमा हैदरच्या मुलांना घरी सुरक्षित पाठवण्याची मागणी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सीमा हैदरचा पती गुलाम हैदर सध्या पाकिस्तानात राहतो.

मीडिया वृत्तानुसार, पाकिस्तानाच्या राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने सीमा हैदरच्या चार मुलांना तत्काळ पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सीमाची ४ मुले पाकिस्तानला जाणार का, हे पाहावे लागेल. सीमा ही प्रियकर सचिन मीणासोबत लग्न करण्यासाठी नेपाळमार्गे भारतात आली होती. याआधी गुलाम हैदरने पंतप्रधान मोदी यांच्याकडे मुलांची कस्टडी मागितली होती. तसेच गुलाम यांनी मुलांना पुन्हा मिळवण्यासाठी पाकिस्तानचे शहबाज शरीफ यांनाही व्हिडिओ संदेशद्वारे मागणी केली होती.

सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या; ४ मुलं पाकिस्तानला जाणार?  कारण काय?
Malanggad landslide : घरात गाढ झोपेत असताना मलंगगडाची दरड कोसळली, लेकाला वाचवताना वडिलांचा मृत्यू

पब्जी खेळताना झाली दोघांची मैत्री

पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरची मैत्री ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या सचिन मीणासोबत पब्जी खेळता खेळता मैत्री झाली होती. सीमाचा पती गुलाम दुबईमध्ये नोकरी करायचा. सचिन आणि सीमाने नेपाळमध्ये काही दिवस एकत्र राहिले. दोघांनी नेपाळमध्ये लग्न करण्याचा निश्चय केला. त्यानंतर सीमा नेपाळमार्गे बेकायदेशीररित्या ४ मुलांना घेऊन भारतात आली. सीमा मागील वर्षी मे महिन्यात भारतात आली होती. त्यानंतर सचिन मीणासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहू लागली.

सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या; ४ मुलं पाकिस्तानला जाणार?  कारण काय?
Bullet Train: अहमदाबाद-मुंबईनंतर देशात आणखी एक बुलेट ट्रेन; दिल्ली-पाटणा प्रवास होणार ३ तासांत

घर विकून सीमा भारतात आली

गुलाम हैदरने सांगितलं की, सीमाच्या बोलण्यावरून दुबईला कामाला गेलो होतो. दुबईला कामाला गेल्याने मुलांची चांगली देखभाल होईल, असं तिने सांगितलं होतं. गुलाम हे सुरुवातीला सीमाला ४० ते ५० हजार रुपये प्रति महिना पाठवत होते. त्यानंतर ते महिन्याला ८० ते ९० हजार रुपये पाठवू लागले. गुलाम यांनी सीमाला १३ लाख पाठवले होते. सीमा घर खरेदी करण्यासाठी पाठवले होते. सीमाने घर खरेदी केलं. मात्र, त्यानंतर सीमा घराची विक्री करून भारतात गेली. सीमाने घराची विक्री केल्याचं कबुल केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com