Petrol Price : पेट्रोल - डिझेल २२ रुपयांनी स्वस्त; इंधन टंचाईच्या काळात भारताचा शेजारी देश पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय

petrol diesel prices by 22 rupees : जगभरात इंधन टंचाईमुळं पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत असतानाच पाकिस्तान सरकारनं तब्बल २२ रुपये प्रतिलिटरनं स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोल-डिझेल २२ रुपयांनी स्वस्त, पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय
Petrol diesel price cuts in Pakistan.saam tv
Published On

पाकिस्तान सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्याच आठवड्यात सहा ते सात रुपये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या होत्या. आता पुन्हा एकदा इंधन दरात कपात केली आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर २२ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

पेट्रोलच्या दरात २२ रुपये प्रतिलिटर, तर हायस्पीड डिझेलच्या दरात प्रतिलिटर २२ रुपयांची कपात केली आहे. आता पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ३८० रुपये झाली आहे. तर डिझेलचे दर प्रतिलिटर ३८१ रुपये झाले आहे. वैश्विक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने पाकिस्तान सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमती आठवडाभरात ११ टक्क्यांनी घसरल्या आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता समझोत्यावर चर्चा सुरू आहे. या प्रस्तावावर अमेरिका विचार करत आहे. दुसरीकडे दोन्ही देशांच्या नेत्यांकडून यासंदर्भात काही तिखट प्रतिक्रियाही आल्या आहेत. त्यामुळं तणाव कायम आहे. विशेषतः होर्मुझसंबंधी अद्यापही सहमती झालेली दिसून येत नाही.

पेट्रोल-डिझेल २२ रुपयांनी स्वस्त, पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय
10 दिवसांत पेट्रोल-डिझेलचा तिसऱ्यांदा भडका; आधीच इंधनटंचाई, त्यात दरवाढीचे चटके, VIDEO

रॉकेलचे दरही घटले

पाकिस्तानच्या पेट्रोलियम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नवे दर ३० मे पासूनच लागू केले जाणार आहेत. ऑइल अँड गॅस रेग्युलेटरी एथॉरिटीने एक नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार, रॉकेलचे दर ३१३.४४ वरून कमी करून २७२ रुपये करण्यात येत आहेत. पाकिस्तानी रुपयानुसार या किंमती आहेत.

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यापासून पेट्रोल - डिझेलचे दर कमी करण्यात येत असले तरी, काही काळापासून पाकिस्तान सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात विक्रमी वाढ करण्यात आली होती. इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर तिथल्या सरकारने ६ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रतिलिटर ५५ रुपयांनी वाढवल्या होत्या. त्यानंतर २ एप्रिल रोजी पेट्रोलच्या किंमती ४३ टक्के, तर डिझेलच्या किंमतीत ५५ टक्क्यांनी वाढवल्या होत्या.

पेट्रोल-डिझेल २२ रुपयांनी स्वस्त, पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय
Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com