Pakistan Army : पाकिस्तानी सैन्यात फुट, लष्कर प्रमुख मुनीरविरोधात पाक सैन्याचं बंड

India Pakistan Tension : भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर आता पाकिस्तानच्या सैन्यात फूट पडलीय... लष्करातील अधिकाऱ्यांनी लष्कर प्रमुख असीम मुनीरविरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय.. मात्र त्याची कारणं काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.....
pakistan army generals rebel
pakistan army generals rebelx
Published On

ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान सैन्याचे अधिकारी आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यात फूट पडलीय. आधीच माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत शत्रूत्व पत्करून जनरल मुनीर यांना रोषाला सामोरे जावं लागलं होतं. अशातच पाक सैन्यातील पंजाबी लॉबी मुनीरच्या विरोधात उभी राहिलीय. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी आणि सैनिक एकापाठोपाठ राजीनामे देत आहेत. त्यामुळे मुनीर याच्या अडचणीत वाढ झालीय.

असीम मुनीरच्या अडचणी वाढल्या

- जनरल असीम मुनीरची पाक सैन्यात हाफिज म्हणून ओळख

- कोर कमांडरमध्ये कट्टर आणि विरोध सहन न करणारे जनरल म्हणून ओळख

- पंजाबी आणि पश्तून पठाणांच्या दृष्टीने मुनीर हे 'मुहाजिर' म्हणजेच स्थलांतरित

- 1947 मध्ये पंजाबमधून मुनीरचे वडील सय्यद यांचे पाकिस्तानात स्थलांतर

- 'मुहाजिर' टॅगचा मुनीरला राग

- 'मुहाजिर' टॅग मिटवण्यासाठी मुनीरच्या भारतविरोधी कारवाया

- माजी लष्कर प्रमुख जावेद बाजवामुळे मुनीरची प्रगती

- माजी पंतप्रधान इम्रान खानना सत्तेतून पायउतार केल्याचा मुनीरवर आरोप

- ऑक्टोबर 2018 मध्ये ISI चे प्रमुख म्हणून नियुक्ती

- पुलवामा हल्ल्यावेळीही असीम मुनीर ISI प्रमुख

pakistan army generals rebel
Viral Video : भाजपच्या आमदाराने तिरंग्यानं पुसलं नाक, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यानं नेटकऱ्यांचा संताप

पाकिस्तानी सैन्य 'ऑपरेशन सिंदूर'ला 1971 पेक्षा मोठा पराभव म्हणून पाहतेय. त्यामुळेच मुनीर विरोधात पंजाबी आणि पश्तून वंशाच्या लष्करी जनरलनी बंड केलय. त्यामुळे लष्करप्रमुख मुनीर यांचं लष्कर प्रमुख पद धोक्यात आलयं. भारतासोबत युद्धाचे स्वप्न पाहणारा मुनीर जेव्हा आपल्याच सैन्यांकडून चहुबाजूंनी घेरला गेला तेव्हा त्यांने शस्त्रसंधी केलीय. मात्र पाक सैन्याच्या फुटीनं मुनीरसह पाकच्या लष्करालाही भारताच्या हल्ल्यानं धडकी भरलीय, हे निश्चित.

pakistan army generals rebel
बीडमध्ये बालविवाह प्रथा सुरूच, १५ वर्षांखालील दहा मुली गर्भवती; धक्कादायक आकडेवारी समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com