Pahalgam Terror Attack: चून चून के मारेंगे, भारताचा प्लॅन ठरला; पाकिस्तानला धडा शिकवणार

Indian Army: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताचा प्लॅन ठरला आहे. या हल्ला घडवून आणणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी भारत तयार झाला आहे. दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी भारताचा मोसाद प्लॅन तयार झाला आहे.
Pahalgam Terror Attack:  चून चून के मारेंगे, भारताचा प्लॅन ठरला; पाकिस्तानला धडा शिकवणार
Pahalgam Terror Attack Update Saam Tv
Published On

स्नेहिल झनके, साम टीव्ही

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्यासाठी इस्त्राईलची गुप्तचर यंत्रणा भारताला साथ देणार आहे. त्याचा फुलप्रुफ प्लॅन पुढे आला आहे. मात्र हा प्लॅन नेमका काय आहे? मोसाद पाकड्यांना कसा तडाखा देणार आहे? हे आपण स्पेशल रिपोर्टमधून पाहणार आहोत....

पहलगामध्ये दहशतवाद्यांनी भारतीयांना मारुन नंगानाच केल्यानंतर आता याच दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी भारताचा मोसाद प्लॅन तयार झाला आहे. आता युद्ध करून जगाला वेठीस धरण्यापेक्षा दहशतवाद्यांना, त्यांच्या मास्टरमाईंडना आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांना वेचून वेचून ठेचून काढण्याचा प्लॅन करण्यात आला आहे. आता दहशतवाद्यांना त्यांच्या घरातून थेट वर पाठवण्याची योजना भारताचा परममित्र इस्रायलसोबत बनवण्यात आली आहे. इस्रायली मोसाद आता भारतविरोधी शत्रूंना प्रसाद द्यायला सज्ज आहे. त्याचा मोठा पुरावा हा पाहा..

Pahalgam Terror Attack:  चून चून के मारेंगे, भारताचा प्लॅन ठरला; पाकिस्तानला धडा शिकवणार
Pahalgam Terror Attack : आता कौतुकाची थाप कोण देणार? दहशतवादी हल्ल्यात वडील गमावलेल्या हर्षलने परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

पाहिलंत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कोणासोबत चर्चा केलीये. त्यांनी नवी दिल्लीत इस्रायलचे राजदूत रुवेन यांची भेट घेऊन देशांमधील दहशतवाद, विशेषतः सीमेपलीकडील इस्लामी दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नांबाबत चर्चा केलीये. त्याचा स्पष्ट्र अर्थ आता इस्रायलला सोबत घेऊन भारत दहशतवादाचा बिमोड करणारेय. भारतानं आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कधीच जगाची शांतता भंग केली नाही मात्र त्याचा अर्थ दहशतवाद्यांना मोकळीक दिली असं अजिबात होत नाही.तर भारतानं शत्रूच्या घरात घसून त्याला संपवल्याचं एअरस्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकनं पाहिलंय.

Pahalgam Terror Attack:  चून चून के मारेंगे, भारताचा प्लॅन ठरला; पाकिस्तानला धडा शिकवणार
Pahalgam attack : काश्मीर खोऱ्यात १४ दहशतवादी अॅक्टिव्ह, लष्करानं यादीच बाहेर काढली, VIDEO

जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाचं जन्मस्थान असलेल्या भारतानं यंदाही स्वता:हून युद्ध पुकारलं नाही तर शत्रूनं हल्ला केल्यानंतर त्याची कोंडी करायला सुरुवात केलीये. दुसरीकडे दहशतवाद्यांना सोडणार नाही याचा संदेशही दिला आहे. म्हणूनच आता भारत मोसादच्या सिक्रेट ऑपरेशनच्या धर्तीवर या क्रूरकर्म्याचा खात्मा करणारेय. मोसाद ही जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर यंत्रणा म्हणून कशी समोर आली पाहुयात सविस्तर...

Pahalgam Terror Attack:  चून चून के मारेंगे, भारताचा प्लॅन ठरला; पाकिस्तानला धडा शिकवणार
Pahalgam Attack : पाकड्यांना युद्धाची खुमखुमी; आधी हिंदूविरोधी वक्तव्य, मग पहलगाम हल्ला, पाहा स्पेशल रिपोर्ट

कोण आहे मोसाद?

मोसाद इस्रायली गुप्तचर यंत्रणा आहे. शत्रूला हेरायचं आणि मारायचं ही रणनिती आहे. मोसादचं गाजलेलं रॉथ ऑफ गॉड ऑपरेशन आहे. जर्मनीतील ऑलिम्पिकमध्ये इस्रायली खेळाडूंवर हल्ला केला. खेळाडूंना ओलिस ठेवून दहशतवाद्यांच्या अवास्तव मागण्या होत्या. मागण्या मान्य न झाल्यानं 11 खेळाडूंना जीवे मारलं. खेळाडूंच्या हत्त्येच्या बदल्यासाठी 20 वर्षे ऑपरेशन सुरू होते. विविध देशांत गोळ्या घालून, बॉम्बस्फोट करुन प्रत्येक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.

20 वर्षे सलग ऑपरेशन सुरू ठेवून इस्रायलनं आपला बदला पूर्ण केला. आता पेहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निशस्त्र भारतीयांना मारुन क्रूरतेचा कळस गाठला. त्यामुळे थेट युद्ध करुन जगाला अस्थिर करण्यापेक्षा ज्यांनी भारतीयांचा आत्मा दुखावला त्या प्रत्येकाचा खात्मा करण्याची वेळ आलीये. आता काऊटंडाऊन सुरू झाला आहे.

Pahalgam Terror Attack:  चून चून के मारेंगे, भारताचा प्लॅन ठरला; पाकिस्तानला धडा शिकवणार
Pahalgam Attack : भारताचं ऑपरेशन पीओके? पाकड्यांचे नापाक इरादे भुईसपाट होणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com