S. Jaishankar: खलिस्तान्यांकडून एस. जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांसमोरच घडला धक्कादायक प्रकार

S. Jaishankar in London: खलिस्तान समर्थकांकडून भारताविरोधी गरळ ओकण्याचे काम सुरू आहे. अशातच लंडनमधून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.
S. Jaishankar
S. Jaishankar in London Saam Tv
Published On

लंडनमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यावर खलिस्तानच्या समर्थकांकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार पोलिसांसमोर झाला. यावेळी घोषणा देणाऱ्यांपैकी एकाने भारताच्या ध्वजाचा देखील अपमान केला. खलिस्तानी समर्थकांनी एस. जयशंकर यांच्यासह अनेक भारतीय अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या. त्यामुळे आता परराष्ट्रमंत्र्याचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

ब्रिटन दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र याबाबत भारत किंवा ब्रिटनकडून अधिकृतपणे काहीही माहिती देण्यात आलेली नाहीये. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर ह्यांनी चॅटम हाऊस थिंक टॅक नावाच्या कार्यक्रमातून बाहेर पडले तेव्हा माघारी येत असताना त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. वृत्तानुसार,एका व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती जयशंकरच्या वाहनाजवळ येतो आणि लंडन पोलीस अधिकाऱ्यांसमोर तिरंग्याचा अपमान केला.

S. Jaishankar
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला धक्का, परस्पर शुल्क लागू होणार; थेट तारीखच जाहीर केली

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी परराष्ट्र मंत्र्यांच्या वाहनाजवळ आलेला व्यक्ती भारतीय अधिकाऱ्यांना आणि परराष्ट्र मंत्र्यांना देखील धमक्या देताना दिसतोय. दरम्यान, ब्रिटन आणि आयर्लंडच्या त्यांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री उच्चस्तरीय चर्चा, परराष्ट्र धोरणातील व्यस्तता आणि भारतीय समुदायाशी संवाद साधतील. या भेटीमुळे दोन्ही देशांसोबतच्या भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांना नवी चालना मिळेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.

S. Jaishankar
Pakistan Pakhtunkhwa Terrorists Attack: रमजानचा उपवास सोडत असताना दहशतवादी हल्ला; १२ ठार, ३० जण जखमी| Video Viral

बुधवारी ब्रिटेनमध्ये एस जयशंकर यांनी डेविड लॅमी यांच्यासोबत दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहारावर चर्चा केली. लॅमी यांनी जयशंकर यांचे आयोजन केले होते. केंटमधील चेव्हनिंग हाऊसमध्ये दोन दिवस दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यामध्ये मुक्त व्यापार करारापासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धापर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com