Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त पोस्ट भोवली, प्रसिद्ध गायिकेवर गुन्हा दाखल

Neha Singh Rathore FIR: पहलगाम हल्ल्याशी संबंधित एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे नेहा सिंग राठोडवर लखनौमध्ये ११ कलमांखाली एफआयआर दाखल झाला आहे. प्रकरणाबद्दल सर्व अपडेट्स आणि तिची प्रतिक्रिया जाणून घ्या.
Pahalgam Attack
Neha Singh Rathore FIRgoogle
Published On

सोशल मीडियावर सध्या पहलगामच्या संबंधित अनेक पोस्ट, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातच नेहा सिंह राठोड या प्रसिद्ध लोकगायिका एका वादग्रस्त पोस्टमुळे लोकांच्या चर्चेत आल्या आहेत. नेहा सिंह राठोड यांना त्यांच्या पोस्टमुळे लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एकुण ११ कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कारण पहलगाम हल्ल्या विरोधात त्यांचे वक्तव्य हे राष्ट्राच्या विरोधात असल्याचे सांगितले जात आहे.

Pahalgam Attack
Rahul Gandhi : 'जम्मू-काश्मीर हा भारताचा...'; श्रीनगरमधील पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधींचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

युपी राजधानी लखनऊमध्ये नेहा सिंह राठोडवर गुन्हा दाखल झाला आहे. तेथील हजरतगंज पोलिस ठाण्यात तीच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणारे हे सुद्धा एक कवीच आहेत. त्यांचे नाव अभय प्रताप सिंह आहे. यांच्याच तक्रारीवरून ११ कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कारवाईची मागणी कोणी केली?

अभय प्रताप सिंह सह नेहा सिंह राठोडवर कारवाईची मागणी करणारे गाजियाबादचे आमदार सुद्धा आहेत. आमदार नंद किशोर गुर्जर यांनी एनएसएकडे कारवाईची मागणी केली आहे. नेहा सिंह राठोड पहलगाम हल्लाविरोधात बोलताना म्हणाल्या होत्या की,'' मी जे काही वक्तव्य करत आहे त्याचा बिहार निवडणुकीत वापर केला जाईल.''

FIR नंतर नेहा सिंह रोठोडची प्रतिक्रीया

नेहा सिंह रोठोड यांनी पुन्हा एकदा FIR दाखल झाल्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये म्हणाल्या की, '' माझ्यावर लखनऊ पोलिस स्टेशने FIR दाखल केले आहे. मात्र माझ्याकडे मदतीला कोणी वकील नाहीये? कृपया मला वकीलांनी मदत करा.'' असे विधान तिने केले. इतकेच नाहीतर पुढे म्हणाली की, ''माझ्या खात्यात फक्त ५१९ रुपये आहेत. त्यातले ५०० रुपये मी तबला वादकाला देईन आणि नवीन गाणे रेकॉर्ड करेन.''

Pahalgam Attack
Thatte Idli Recipe: मऊ लुसलुशीत इडली पोडी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी पद्धत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com