Saam Tv
तुम्ही कधी साउथ इंडियन हॉटेलमध्ये जात असाल तर तिथे तुम्हाला अनेक प्रकारच्या इडल्या विकत मिळत असतील.
आज आपण त्याच पद्धतीतली Thatte Idli कशी बनवायची? हे सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत.
तांदूळ, पोहे, साबुदाणे, उडीद डाळ,मीठ, तेल, चणा डाळ, तुर डाळ, जीरे,तीळ, लाल मिरची, हिंग आणि कढीपत्ता.
सुरुवातीला तांदुळ, साबुदाणे, पोहे आणि उडदाची डाळ २ ते ३ तास भिजवा. मग त्याचे बारिक वाटण करून पुन्हा ६ तास भिजत ठेवा.
आता एका भांड्यात तुम्हाला हवे तितकेच पीठ घ्या. त्यात थोडं पाणी आणि मीठ घाला.
दुसऱ्या बाजूला इडलीचे भांडे गरम करा. त्याला तेल लावा. तसेच पाणी उकळायला लागल्यावर त्यात पीठ घाला आणि १० मिनिटे वाफवा.
इडलीसोबत मसाला तयार करण्यासाठी तुम्ही उडीद ,चणा आणि तूर डाळ परता. त्यात नंतर जिरे आणि तीळ घालून छान भाजा.
आता सुकलेल्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घेऊन तेलात फोडणी द्या. नंतर त्यात चिमुटभर हिंग घाला. हे मिश्रण थंड झाल्यावर वाटून घ्या आणि गरमा गरम इडलीसोबत सर्व्ह करा.