Saam Tv
उन्हाळ्यात आपण लिंबू पाणी पिणं जास्त पसंत करतो. पण लिंबू लगेचच सुकतात.
सुकलेले लिंबू आपण फेकून देतो. त्याऐवजी तुम्ही त्याचा वापर घरातल्या कामांसाठी करू शकता. त्याने तुमचा वेळ वाचू शकतो.
तुम्ही गरम पाण्यामध्ये लिंबू टाकून हर्बल टी तयार करू शकता.
चॉपिंग बोर्ड साफ करताना तुम्ही साबणा ऐवजी सुकलेल्या लिंबाचा आणि मीठाचा वापर करू शकता.
तुमच्या भांड्यांचा चिकटपणा जात नसेल तर सुके लिंबू घेऊन तुम्ही भांडी घासू शकता.
भिंतीवर असलेले डाग सहसा निघत नाहीत. अशा वेळेस तुम्ही लिंबूने ते स्वच्छ करू शकता.
वाळवलेले लिंबू पोटफुगी आणि अपचन यांसारख्या दूर करण्यासाठी वापरू शकता.
तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर लिंबू चेहऱ्यावर स्क्रब म्हणून लावू शकता.