IRCTC Website Technical Issue: १० तासांपासून IRCTC ची वेबसाईट आणि अ‍ॅप बंद, तिकीट बुक होत नसल्याने प्रवासी त्रस्त

IRCTC Ticket Booking Service Down: ही वेबसाईट कशामुळे बंद आहे यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
IRCTC Ticket Booking
IRCTC Ticket BookingSaam Tv
Published On

IRCTC Down: ऑनालाईन रेल्वे तिकीट बुक (Online Railway Ticket Booking) करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आयआरसीटीसीची वेबसाईट तांत्रिक कारणांमुळे बंद आहे. गेल्या १० तासांपासून ही आयआरसीटीसीची वेबसाईट (IRCTC Website) आणि ॲप दोन्ही बंद आहेत. या वेबसाईटवरुन तिकीट बुकिंसाठी पेमेंट करता येत नाही. त्यामुळे देशभरातील लाखो रेल्वे प्रवाशांना तिकीट बुक करताना समस्या येत आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. ही वेबसाईट कशामुळे बंद आहे यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

IRCTC Ticket Booking
Meghalaya CMs Office Attack : मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर जमावाचा हल्ला, 5 सुरक्षा कर्मचारी जखमी

आयआरसीटीसीने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये आयआरसीटीसीने असे सांगितले आहे की, तांत्रिक अडचणीमुळे वेबसाइट आणि अ‍ॅपवरून तिकीट बुकिंगसाठी पेमेंट केले जात नाही. पेमेंटबाबत तांत्रिक समस्या फक्त अ‍ॅप आणि वेबसाइटवर येत आहे. त्यामुळे बुकिंगसाठी तुम्ही आस्क दिशा (Ask Disha ) पर्याय निवडू शकता. याशिवाय तुमच्या आयआरसीटीसी ई-वॉलेटमध्ये पैसे असतील तर तिथून तिकीट बुकिंग करु शकता. याशिवाय, तुम्ही रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरून तिकीट बुक करू शकता.'

आयआरसीटीसीने प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी आणखी काही पर्याय दिले आहेत.'पर्यायाने Amazon, Makemytrip इत्यादी इतर B2C प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला तिकीट बुक करता येईल.', असे आयआरसीटीसीने सांगितले आहे. तसंच ही तांत्रिक अडचण सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तांत्रिक अडचण दूर होताच माहिती दिली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

IRCTC Ticket Booking
Loan Repayment : जबरदस्ती कर्जवसुली करणाऱ्या बँकांना अर्थमंत्र्यांनीच दिली 'वॉर्निंग'; म्हणाल्या...

आयआरसीटीसीची वेबसाईटवर तिकीट बुक करताना अडचणी येत असल्यामुळे युजर्स तक्रारी करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत ते आयआरसीटीसी आणि रेल्वेला टॅग करुन ही तक्रार करत आहेत. वेबसाईट आणि अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळे तिकीट बुक करताना युजर्सचे पैस करत आहेत.

एका युजरने आपल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, ही समस्या लवकर सोडवा. मी लागोपाठ तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत आहे पण ते बुक होत नाहीये. माझे ५ वेळा पैसे कट झाले आहेत.पण तिकीट बुक होत नाहीये.' या युजरने याचा स्क्रिनशॉर्ट देखील शेअर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com