Meghalaya Cm's Office Attacked by Mob: मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या कार्यालयावर सोमवारी संध्याकाळी जमावाने हल्ला केला, त्यात पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यापासून मुख्यमंत्री संगमा (Meghalaya Cm Conrad Sangma) सुरक्षित आहेत. ते अजूनही तुरा येथील त्यांच्या कार्यालयात आहेत.
एक वृत्तानुसार, शेकडो लोकांनी त्यांच्या कार्यालयाला घेराव घातला होता. गारो हिल्समधील नागरी समाज गट तुरा येथे हिवाळी राजधानी बनवण्याची मागणी करत आहे. आपल्या मागणीसाठी हे लोक उपोषणही करत आहेत.
मुख्यमंत्री संगमा तुरा येथील सीएमओ कार्यलयात आंदोलनकर्त्या संघटनांशी 3 तासांहून अधिक काळ चर्चा करत होते. दरम्यान, अचानक हजारोंचा जमाव या कार्यालय जवळ आला आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. सीएमओ कार्यलयाच्या खिडक्यांवरही दगडफेक करण्यात आली आहे.
पोलिसांनी प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या संपूर्ण घटनेत आणि गोंधळात ५ पोलीस जखमी झाले. (Latest Marathi News)
जमावाने गेट तोडण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हिंसाचारात जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची प्रकृतीची मुख्यमंत्री संगमा यांनी घेतली आहे. ते संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री संगमा जखमी सुरक्षा कर्मचार्यांशी बोलत असल्याचे फोटो समोर आले आहेत. जखमी सुरक्षा कर्मचारी जमिनीवर बसल्याचे फोटोत दिसत आहे.
मुख्यमंत्री संगमा त्यांच्या प्रकृतीची विचारणा करताना दिसत आहेत. पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत हल्लेखोर जमावातील किती जण जखमी झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.