Rain Alert in Maharashtra : उद्या मुंबईसह ८ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोल्हापूरकरांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा

Rain Forecast for Maharashtra : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २६ जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार आहे.
Rain Forecast for Maharashtra
Rain Forecast for Maharashtra Saam TV
Published On

Rain Update : राज्यात अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती आहे. हवामान विभागान उद्या अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २६ जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार आहे.

उद्या मुंबईसह ठाण्यातही मुसळधार पावसाचा  (Heavy Rain) अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली दिला आहे.

Rain Forecast for Maharashtra
Koyna Dam Water Level : कोयना धरण व्यवस्थापनाचा नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा, आज दुपारी चार वाजता...

8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस उद्या पडू शकतो. (Latest News)

कोल्हापूरकरांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा

गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पंचगंगा नदी 39 फुटांच्या इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. पंचगंगा नदी शेजारी असणाऱ्या अनेक गावांना पुराचा फटका बसत असतो. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर हे चिखली, आंबेवाडी या गावांना भेट देऊन पाहणी करत आहेत. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com