Onion Rate Today : कांद्याने सर्वसामान्यांना रडवलं! प्रति किलो रुपये इतक्या रुपयांवर पोहोचला; आजचे दर काय? वाचा

Onion Rate Hike Today Update News : महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. दिल्लीत कांद्याचा किरकोळ दर ६२ रुपये किलोवर पोहोचला असून मुंबईत १ सप्टेंबरपासून दूधही महागणार आहे. पेट्रोल-डिझेल आणि LPG दरवाढीमुळे घरखर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Onion Prices Double In A Year, Milk And Fuel Prices Also Rise
Onion Prices Double In A Year, Milk And Fuel Prices Also RiseAI Image
Published On
Summary
  • कांद्याचा किरकोळ दर ६२ रुपये किलोवर

  • वर्षभरात कांद्याच्या किमतीत जवळपास दुप्पट वाढ

  • मुंबईत १ सप्टेंबरपासून दूध ९ रुपयांनी महागणार

  • पेट्रोल-डिझेल आणि LPG सिलेंडरच्या दरात वाढ

महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं आहे. साखर, दूध, पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलेंडरनंतर आता कांद्याच्या वाढलेल्या दरानेही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. रोजच्या स्वयंपाकातील महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती वाढ झाल्याने आगामी सणासुदीच्या काळात घरखर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कांद्याचे आजचे दर काय?

कंज्यूमर अफेयर्सच्या माहितीनुसार,३१ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये कांद्याचा किरकोळ दर सुमारे ६२ रुपये प्रति किलोवर पोचला आहे. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी याच काळात कांदा सुमारे ३३ रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. म्हणजेच एका वर्षात कांद्याच्या किमतीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात देशात कांद्याचा सरासरी दर सुमारे ३५ रुपये प्रति किलो होता.

Onion Prices Double In A Year, Milk And Fuel Prices Also Rise
Cucumber Benefits : काकडी सोलायची की नाही? ९०% लोक करतात ही चूक; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

मुंबईत दूधही महागणार

मुंबईकरांच्या खिशावरही दूध दरवाढीचा अतिरिक्त भार पडणार आहे. सध्या होलसेल बाजारात दूध सुमारे ९३ रुपये प्रति लिटर दराने मिळत असून, १ सप्टेंबरपासून हा दर १०२ रुपये प्रति लिटर होणार आहे. म्हणजेच प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ होणार आहे. हिरवा चारा, चुणी आणि इतर पशुखाद्यांच्या वाढलेल्या किमतींचा विचार करून दूध उत्पादक संघटनेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय राईच्या तेलाचा दरही किरकोळ बाजारात २०० रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे.

Onion Prices Double In A Year, Milk And Fuel Prices Also Rise
Maharashtra Politics : सर्वात मोठी बातमी! मुंबईच्या महापौर पदासाठी शिंदेसेनेचं ऑपरेशन टायगर? ४ बड्या नेत्यावर मोठी जबाबदारी

पेट्रोल-डिझेल आणि LPG मुळेही खर्च वाढला

काही महिन्यांपासून परराष्ट्रात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधनाच्या किमतींवरही झाला. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ करण्यात आली होती. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेल सुमारे ७.५ रुपये प्रति लिटरपर्यंत महागले. दरम्यान, घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीतही यावर्षी वाढ झाली आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरचा दर सुमारे ७९ रुपयांनी वाढला असून, दिल्लीमध्ये तो आता ९४२ रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांसोबतच हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या व्यावसायिकांनाही वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com