india Pakistan War : मुस्लीम राष्ट्रांचा दहशतवादाला पाठींबा, भारताविरोधात ५६ मुस्लिम देश

India vs Pakistan Muslim countries : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने मुस्लिम देशांची मदत मागितली असून, काही देशांनी अप्रत्यक्षपणे दहशतवादाला पाठिंबा दिला आहे. तर सौदी अरेबिया, युएईसारखे देश भारताच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत आहे.
India vs Pakistan Muslim countries
India vs Pakistan Muslim countriesSaam TV News
Published On

Muslim nations India Pakistan conflict : पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाला पाकिस्तानने आता धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केलाय.. तर मुस्लीम देशांच्या संघटनेनं पाकिस्तानला खुलं समर्थन दिलंय.. मात्र हे कोणते देश आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

पहलगाम हल्ल्यानंतर आता कुठल्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे.. त्यामुळे धडकी भरलेल्या पाकिस्तानने आता मुस्लीम कार्ड खेळलंय.. तर मुस्लीम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनकडे पाकिस्तानने मदतीसाठी भीक मागितलीय.. तर चीन आणि तुर्कीनंतर आता मुस्लीम देशांच्या संघटनेनं पाकिस्तानला म्हणजेच अप्रत्यक्षपणे दहशतवादाला पाठींबा दिल्याचं समोर आलंय...मात्र कोणते देश कुणाच्या सोबत आहेत? पाहूयात....

India vs Pakistan Muslim countries
Ladki Bahin Yojana : लाडकीला खूशखबर! एप्रिलचे ₹१५०० कधी येणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली

कोणते देश कुणासोबत?

सीरिया

इराक

अझरबैजान

तुर्की

मलेशिया हे देश पाकिस्तानसोबत आहेत....

तर सौदी अरेबिया, युएई, कतार, ओमान, कुवैत, बहरीन आणि इजिप्त हे देश भारतासोबत असल्याचं चित्र आहे....

India vs Pakistan Muslim countries
Vande Bharat : वंदे भारत नागपूरहून मुंबईसाठी धावणार, कुठे कुठे थांबणार? तिकीट किती?

मुस्लीम देशांच्या संघटनेत वर्चस्वाचा वाद आहे.. त्यामुळे तुर्की पाकच्या बाजूने उभी असली तरी सौदी अरेबिया मात्र भारताला पाठींबा देत आहे... त्यामुळे 57 देशांपैकी 20-25 देश भारताविरोधात भूमिका घेत असले तरी अनेक देशांच्या व्यापारी नाड्या भारताच्या हाती आहेत... त्यामुळे ठरावाला पाठींबा देणारे देश युद्ध सुरु झाल्यास पाकिस्तानला पाठींबा देण्याची शक्यता कमीच असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय..

India vs Pakistan Muslim countries
Pune : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर, तिकीट किती, थांबा कुठे? जाणून घ्या डिटेल्स

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन बंदुकीच्या जीवावर नंगानाच केला... त्याचा निषेध करणं सोडून मुस्लीम देश दहशतवादाला पाठींबा देणाऱ्या पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहत असतील तर भारतानेही तेल आयातीपासून ते व्यापारी निर्बंध टाकून या देशांचा माज मोडायला हवा.... त्यामुळेच इतर राजनैतिक पर्यायांचा वापर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठींबा मिळवून पाकिस्तानला भुईसपाट करण्याची योजना आखायला हवी.

India vs Pakistan Muslim countries
Satbara Utara : सातबारा उताऱ्यासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, महसूल विभागाचे परिपत्रक जारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com