Airport : विमानतळाचे नाव बदलले, आता नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखले जाणार; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Narendra Modi International Airport : उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ठेवण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे.
Narendra Modi International Airport
Narendra Modi International Airportsaam tv
Published On: 

Jewar airport renamed after Narendra Modi : उत्तर प्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (जेवर एअरपोर्ट) नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंजुरी दिली आहे. देशातील सर्वात मोठ्या आणि हायटेक मानल्या जाणाऱ्या या ड्रीम प्रोजेक्टचे नाव आता अधिकृतपणे बदलण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जेवर विमानतळाचे नाव आता 'नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट' असे असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरून या आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवी ओळख निश्चित करण्यात आली आहे.

एअरपोर्टच्या नामकरणामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. उत्तर भारतातील हे सर्वात मोठे विमान वाहतूक केंद्र ठरणार असून, या नव्या नावाच्या घोषणेनंतर आता या प्रोजेक्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यामध्ये अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीची माहिती देताना मुख्यमंत्री योगी यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी सांगितले की, नोएडातील जेवर विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात येईल. जेवर विमानतळाचे नाव बदलून 'नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Narendra Modi International Airport
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांवर अखेर मोठी कारवाई! 'या' आंदोलकांवर थेट गुन्हा दाखल; नक्की काय घडलं?

मुख्यमंत्री योगी म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा २५ वर्षांचा प्रवास हा लोकसेवेद्वारे जनकल्याण आणि लोकसहभागातून जनतेचा विश्वास यांचे एक अद्वितीय उदाहरण आहे. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन उत्तर प्रदेशने प्रशासनाची एक नवीन कार्यसंस्कृती स्वीकारली आहे. सुशासन, मजबूत कायदा आणि सुव्यवस्था, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण ही उत्तर प्रदेशची ओळख बनली आहे. नव्या आत्मविश्वासाने उत्तर प्रदेश नवीन उंची गाठत आहे.

Narendra Modi International Airport
Pune : एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् पुण्यात बंड शमलं! चिवटेंची तलवार म्यान, भैय्या मानेंसह बंडखोरांची माघार

मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींचे उत्तर प्रदेशसोबतचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. २०१४ मध्ये पंतप्रधानांनी काशीला भेट दिली होती, त्यावेळी ते म्हणाले होते की गंगा मातेने त्यांना साद घातली आहे. काशी आणि गंगा मातेपासून सुरू झालेले हे जिव्हाळ्याचे नाते काळाच्या ओघात अधिक घट्ट झाले आहे. आज ते राज्याच्या सर्वांगीण परिवर्तनाचा आधार बनले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित निर्धाराने उत्तर प्रदेश अभूतपूर्व प्रगतीच्या मार्गावर पुढे वाटचाल करत आहे.

Narendra Modi International Airport
आंदोलनाआधी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! CJP ला दिला मोठा दिलासा, नेमका युक्तिवाद काय झाला?

२०१७ पूर्वी उत्तर प्रदेश प्रशासकीय अस्थिरता, असुरक्षिततेची भावना आणि मूलभूत सुविधांच्या अभावाशी झुंज देत होता. मात्र, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रशासनाची नवी कार्यसंस्कृती स्वीकारली. आज मजबूत कायदा-सुव्यवस्था, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण हीच उत्तर प्रदेशची नवी ओळख बनली आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com