पुण्यात MPSC विद्यार्थ्यांवर अखेर मोठी कारवाई! 'या' आंदोलकांवर थेट गुन्हा दाखल; नक्की काय घडलं?

Pune MPSC Protest : पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनप्रकरणी प्रमोद पाटील, अक्षय कांबळे यांच्यासह १५ जणांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना जमाव जमवणे, सार्वजनिक रस्ता अडवणे आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
Pune MPSC Protest
Pune MPSC ProtestSaam
Published On: 

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune MPSC protest case against 15 students : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांविरोधात पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि आयोजकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. १ ऑक्टोबर रोजी बेकायदेशीरपणे जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPSC च्या विविध मागण्या आणि अध्यक्षांच्या भूमिकेविरोधात १ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांनी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर एकत्र येत मोठे आंदोलन छेडले होते. मात्र, परवानगीशिवाय आणि बेकायदेशीरपणे जमाव जमवून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका ठेवत विश्रामबाग पोलिसांनी अखेर ही कायदेशीर कारवाई केली आहे. आंदोलनाचे मुख्य आयोजक प्रमोद पाटील, अक्षय कांबळे यांच्यासह एकूण १५ जणांवर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार समीर पवार यांनी याप्रकरणी अधिकृत तक्रार (फिर्याद) दिली आहे.

Pune MPSC Protest
Pune : एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् पुण्यात बंड शमलं! चिवटेंची तलवार म्यान, भैय्या मानेंसह बंडखोरांची माघार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, MPSC आंदोलनाच्या परवानगीबाबत आणि चर्चेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी प्रमोद पाटील व इतर विद्यार्थी २५ सप्टेंबर रोजी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात गेले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात २ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यासाठी अलका टॉकीज चौक, अहिल्या अभ्यासिका आणि एस. एम. जोशी पूल अशी तीन ठिकाणे सुचवली होती. पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी एस. एम. जोशी पुलावर आंदोलन करण्याची मागणी केली. त्यानुसार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अटी व शर्तींच्या अधीन राहून एस. एम. जोशी पुलाजवळ आंदोलन करण्याची लेखी परवानगी त्यांना देण्यात आली होती.

मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर रोजीचे आंदोलन स्थगित करत असल्याचे पत्र पोलिसांना दिले. आंदोलन रद्द झाल्यामुळे पोलिसांनी दिलेला परवानगीचा आदेश निरर्थक ठरल्याने तो रद्द करण्यात येत असल्याचे लेखी पत्रही देण्यात आले होते.

मात्र, १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा कोणतीही परवानगी न घेता विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी पुण्यातील शास्त्री रोडवर अचानक बेकायदेशीर जमाव जमवला. सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना एकत्र करून रस्ता अडवण्यात आला, असा आरोप पोलिसांनी केला आहे.

Pune MPSC Protest
आंदोलनाआधी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! CJP ला दिला मोठा दिलासा, नेमका युक्तिवाद काय झाला?

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे:

याप्रकरणी प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने (विद्यार्थी प्रतिनिधी) व त्यांचे सोबत असणारे प्रवीण महादेव पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, प्रियाका चौधरी, नितीन गिते, सोमनाथ चव्हाण, ओंकार पाटील, गजानन शेळके, अजित काकडे, सिंद्धाथ पंचांगे, संकेत कणसे, सिंद्धाथ जांभुळकर, साहेबराव क्षिरसागर असे गुन्हा दाखल केल्याची नावे आहेत. बेकायदेशिरपणे जमाव जमवून आंदोलन करण्यास चिथावणी देवुन सार्वजनिक रहदारीचा रस्ता अडवून विनापरवाना आंदोलन करुन वरील जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com