Nobel Peace Prize: मूळ भारतीय वंशाच्या महिलेला मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार; कोण आहेत नावी पिल्लई?

Navi Pillay Wins Nobel Peace Prize 2026: यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार मूळ भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना जाहीर झाला. त्यामुळे यावेळी देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे स्वप्न भंगलं.
Nobel Peace Prize: मूळ भारतीय वंशाच्या महिलेला मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार; कोण आहेत नावी पिल्लई?
Nobel Peace Prizesaam tv
Published On: 
  • २०२६ चा शांततेचा नोबेल पुरस्कार नावी पिल्लई यांना जाहीर

  • नावी पिल्लई या मूळ भारतीय वंशाच्या आहेत

  • नावी पिल्लई यांचे मानवाधिकार क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार मिळाला

  • नावी पिल्लई या संयुक्त राष्ट्रांच्या माजी मानवाधिकार प्रमुख होत्या

शांततेचा नोबेल पुरस्कार कुणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. नोबेल कमिटीने २०२६ चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे. मूळ भारतीय वंशांच्या नवनेथम नावी पिल्लई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी नवनेथम नावी पिल्लई यांना हा पुरस्कार देत सन्मान करण्यात आला.

नवनेथम नावी पिल्लई या मूळ भारतीय वंशाच्या आहेत. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नावी पिल्लई यांचा जन्म दक्षिण अफ्रिकेत २३ सप्टेंबर १९४१ मध्ये झाला होता. नरैनसामी नायडू आणि संथामा नायडू हे त्यांचे आई-वडील होते. त्यांचे कुटुंब तमिळ होते. त्यांचे आजी-आजोबा १८९० मध्ये भारतातून काम करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत आले होते.

तमिळ वंशाचे असलेल्या नवनेथम नावी पिल्लई यांनी दक्षिण आफ्रिकेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून आणि रवांडा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातही न्यायाधीश म्हणून काम केले आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून देखील काम केले आहे. राष्ट्रीय सीमा ओलांडून मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर तत्वे मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य हे त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.

Nobel Peace Prize: मूळ भारतीय वंशाच्या महिलेला मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार; कोण आहेत नावी पिल्लई?
Nobel Peace Price: डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न तुटलं; मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांततेचा पुरस्कार

नवनेथम नावी पिल्लई यांनी वर्णभेदाविरुद्ध लढलेल्या नेल्सन मंडेला यांच्यासह अनेक व्यक्तींचे कायदेशीर लढाईत प्रतिनिधित्व केले आहे. नावी पिल्लई यांनी गाझामधील इस्राइलच्या लष्करी कारवायांवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ऐवढेच नाही तर युद्धगुन्हे आणि नरसंहारासाठी जबाबदार असलेल्यांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान, शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा निराशा झाली आहे. ट्रम्प यांना यावर्षी देखील शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही.

Nobel Peace Prize: मूळ भारतीय वंशाच्या महिलेला मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार; कोण आहेत नावी पिल्लई?
Nobel Price: ट्रम्प यांचे स्वप्न धुळीस मिळवणाऱ्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com