Nobel Price: ट्रम्प यांचे स्वप्न धुळीस मिळवणाऱ्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

Who Is María Corina Machado : हुकूमशाहीविरुद्धच्या मारिया कोरिना मचाडो यांनी मोठा लढा लढला होता. त्यासाठी त्यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आलाय.
Who Is María Corina Machado
María Corina Machado wins the 2025 Nobel Peace Prize for her fight to preserve democracy,saam tv
Published On
Summary
  • मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर.

  • डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल पुरस्काराचे स्वप्न तुटले.

  • मचाडो या व्हेनेझुएलातील महिला नेत्या आहेत.

नोबेल शांती पुरस्काराची घोषणी आज करण्यात आली. व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना हा पुरस्कार देण्यात आला. लोकशाही जपण्यासाठी कोरिना यांनी मोठं योगदान दिलंय. हुकूमशाहीविरुद्धात लढा देत त्यांनी लोकशाही आणली. मारिया कोरिना यांना हा पुरस्कार मिळाल्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न धुळीस मिळालंय.

Who Is María Corina Machado
Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

ज्यांच्यामुळे ट्रम्प यांचे स्वप्न भंग झालं त्या मारिया कोरिना मचाडो ह्या कोण आहेत, हे जाणून घेऊ. मारिया कोरिना मचाडो पेरिस्का यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ ला झाला होता. २०११ ते २०१४ पर्यंत व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेच्या निर्वाचित सदस्य म्हणून काम केलं. वर्ष २०२४ च्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती.

परंतु सरकारनं त्यांच्या उमेदवारी रद्द केली होती. त्यानंतर मचाडो यांनी एडमंडो गोंजालेज उरूतिया पार्टीचं प्रतिनिधत्व केलं होतं. याच दरम्यान राजकीय वादावर लक्ष न घालता. कार्यकर्त्यांना जोडलं. तसेच पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूक करण्यासाठी निवडणूक पर्यवेक्षक म्हणून ट्रेनिंग देण्यात आली.

Who Is María Corina Machado
Nobel Peace Price: डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न तुटलं; मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांततेचा पुरस्कार

कोरिना मचाडो यांनी वर्ष २००२ मध्ये राजकारणात पदार्पण केलं होतं. वोट-मॉनिटरिंग ग्रुप सुमाते सुरू केलं होतं. त्या संघटनाच्या संस्थापक बनल्या. त्यानंतर माचाडो यांनी व्हेंटे व्हेनेझुएला राजकीय पक्षाची स्थापना केली. अलेजांद्रो प्लास यांना राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांनी नियुक्त केलं. २०१८ मध्ये माचाडो यांना बीबीसीच्या १०० महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आले. २०२५ मध्ये टाइम मासिकाने माचाडो यांना जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींपैकी एक म्हणून घोषित केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com